Post Office Scheme : बँकांच्या एफडी योजना आता गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरतायेत. गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर फारच कमी झाले आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडी चे व्याजदर सुद्धा घटवण्यात आले आहे.
यामुळे आता गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागतोय. सुरक्षित गुंतवणुकीसाठी फक्त एफडीचाच ऑप्शन नाहीये तर पोस्टाच्या बचत योजना देखील गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या ठरतात. दरम्यान आज आपण पोस्टाच्या अशाच एका स्मॉल सेविंग स्कीम बाबत माहिती पाहणार आहोत.

आज आपण पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत त्याला एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे.
यातील पाच वर्ष कालावधीच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सर्वाधिक व्याज दिले जाते. दरम्यान पोस्टाच्या याच योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदार साडेचार लाख रुपयांचे व्याज मिळवू शकणार आहेत.
पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ठरणार फायद्याची
Time Deposit योजनेचा कालावधी | व्याजदर |
1वर्ष | 6.9% |
2 वर्ष | 7.0% |
3 वर्ष | 7.10% |
5 वर्ष | 7.50% |
आता जर गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत दहा लाखांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.50% दराने 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत. अर्थात पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना चार लाख 49 हजार 948 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
या योजनेत तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणार त्या आधारावर तुम्हाला व्याज मिळणार आहे. समजा आता एखाद्याने या योजनेत पाच लाखाची गुंतवणूक केली तर त्याला सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतील. म्हणजे दोन लाख 24 हजार 974 व्याज म्हणून मिळणार आहेत.
कर सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास ही योजना फायद्याची ठरते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर विभागाच्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट सुद्धा दिली जात आहे. योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना जर मध्येच पैशांची अडचण आली तर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या आधारावर लोन सुद्धा मिळू शकते.
या योजनेत सिंगल तसेच जॉईंट अकाउंट ओपन करता येते. तुम्ही तुमच्या दहा वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावाने देखील या योजनेत खाते ओपन करू शकता. मुलांच्या नावाने ओपन होणारे अकाउंट त्यांचे पालक मॅनेज करू शकतील.