Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. आरबीआय कडून रेपो रेटमध्ये गेल्यावर्षी जवळपास 1.25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली.
आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील सरकारी आणि खाजगी बँकांनी आपल्या एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी केले. यामुळे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय.

मात्र पोस्ट ऑफिस च्या बचत योजनेचे व्याजदर आज सुद्धा कायम आहे. त्यामुळे अनेक जण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
कारण आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत जिथे दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 90 हजार रुपयांचे फिक्स व्याज मिळणार आहे.
पोस्टाच्या टीडी योजनेची कमाल
पोस्ट ऑफिस कडून टाईम डिपॉझिट योजना सुरू करण्यात आली आहे ज्याला पोस्टाची डिपॉझिट योजना म्हणून ओळखले जाते. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. योजनेचा कालावधी बँकांच्या एफडी योजनेंप्रमाणे वेगवेगळ्या आहे.
पोस्ट ऑफिसची टीडी योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षे कालावधीची आहे. त्यातील एका वर्षाच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 6.9% दराने व्याज दिले जात आहे.
दोन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास 7 टक्के दराने व्याज मिळते. तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.10% दराने व्याज दिले जाते. सर्वात जास्त व्याज पाच वर्षांच्या टीडी योजनेत मिळते, पाच वर्षांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
दोन लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार 90 हजाराचे व्याज
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या पाच वर्षांच्या टीडी योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटीवर दोन लाख 89,990 मिळणार आहेत अर्थात 89 हजार 990 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.
थोडक्यात दोन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना पाच वर्षांच्या काळात 90 हजार रुपयांचे व्याज मिळू शकते. या योजनेत सामान्य ग्राहकांना जेवढे व्याज दिले जाते तेवढेच व्याज ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सुद्धा मिळते.













