Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत 8 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार साडेतीन लाख रुपयांचे व्याज !

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात आणि यासाठी तुम्ही पोस्टाचा पर्याय निवडणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

कारण आज आपण पोस्टाच्या सर्वाधिक व्याज देणाऱ्या एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत, जिथे गुंतवणूक करून गुंतवणूकदार अवघ्या काही वर्षात लखपती बनणार आहे.

ही अशी योजना आहे जिथे आठ लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला साडेतीन लाख रुपयांचे निव्वळ व्याज मिळणार आहे, म्हणजेच एकूण साडेअकरा लाख रुपये मिळणार आहेत.

नक्कीच आता तुम्हाला या योजनेबाबत डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल , चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पोस्टाच्या या लोकप्रिय योजनेची सविस्तर माहिती. 

कोणती आहे ही योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्कीम. या योजनेत फक्त सीनियर सिटीजन म्हणजेच ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा नागरिकांनाच गुंतवणूक करता येते.

ही योजना केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे आणि योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. यात कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. महिला असो किंवा पुरुष यामध्ये साऱ्यांना गुंतवणूक करता येते.

फक्त अट एकच आहे ती म्हणजे गुंतवणूकदार हा सीनियर सिटीजन असायला हवा. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचा व्याजदर. गेल्या काही महिन्यांच्या काळात बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर फार कमी केले आहे

मात्र पोस्टाची ही योजना आजही गुंतवणूकदारांना 8.2% दराने व्याज देते जे की कोणत्याही बँकेच्या कोणत्याही कालावधीच्या एफडी योजनेपेक्षा अधिक आहे. या योजनेत आठ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर तीन लाख 28 हजार रुपये व्याज मिळते.

म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपयांचे व्याज मिळते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. आठ लाखांच्या गुंतवणुकीवर दर तीन महिन्यांनी 16,400 रुपयांचे व्याज देणारी ही योजना सिनिअर सिटीजन ग्राहकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली आहे.

या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल त्याचवेळी कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजे एक हजार रुपयांपेक्षा कमी आणि 30 लाखांपेक्षा जास्त रक्कम यामध्ये गुंतवता येत नाही.

विशेष म्हणजे योजनेचा कालावधी पूर्ण झाला की पुन्हा एकदा तीन वर्षांपर्यंत कालावधी वाढवता येतो. या योजनेत स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचारी 55 वर्षानंतर गुंतवणूक करू शकतात. तसेच सैन्यातून निवृत्त होणारा कर्मचाऱ्यांना 50 व्या वर्षानंतर पण गुंतवणूक करता येऊ शकते.

तरीही याच्या नियमाबाबत अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस सोबत संपर्क साधू शकता. नक्कीच तुम्हाला तुमच्या परिवारातील ज्येष्ठांच्या नावे गुंतवणूक करायची असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन राहणार आहे.