25 हजार रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रुपयांचे रिटर्न ! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर 

Published on -

Post Office Scheme : 2025 हे वर्ष कर्जदारांसाठी फायद्याचे ठरले आहे. यावर्षी आत्तापर्यंत आरबीआय ने रेपो रेट मध्ये एक टक्क्याहून अधिक कपात केली आहे. याचा परिणाम म्हणूनच सर्वच प्रकारचे कर्ज स्वस्त झाले आहे. गृह कर्ज घेणाऱ्यांना देखील या निर्णयाचा फायदा झाला आहे. परंतु या निर्णयामुळे बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी केले आहे.

यामुळे एफ डी मध्ये केलेली गुंतवणूक ग्राहकांना फायदेशीर ठरत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा आजही पोस्ट ऑफिसच्या सुरक्षित बचत योजनांचे व्याजदर कायम आहे. यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये केलेले गुंतवणूक ग्राहकांना चांगला नफा मिळवून देत आहे.

अशा स्थितीत जर तुम्हाला ही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की आज आपण अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे 25000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना 18 लाख रुपयांचा निधी उभारता येणार आहे. 

 कोणती आहे ही योजना?

 आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्टाची आरडी योजना. ही योजना पाच वर्षांची असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज दिले जात आहे. या योजनेत एकाच वेळी पैसा गुंतवावा लागत नाही.

गुंतवणूकदारांना आपल्या सोयीने आणि गरजेप्रमाणे प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते ज्यावर पोस्टकडून एक निश्चित दराने व्याज दिले जाते. या योजनेत दरमहा गुंतवलेल्या पैशांवर 6.5% दराने व्याज दिले जाते.

योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याला सरकारची हमी आहे म्हणजेच तुम्ही गुंतवलेले पैसे कुठेच वाया जात नाहीत. त्यामुळे हा एक गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय म्हणून उदयास आला आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने नागरिकांना नियमित बचतीची सवय लागते.

योजनेत नियमित मासिक ठेव ठेवल्यास केवळ बचत मजबूत होत नाहीत तर गुंतवणूकदारांना आर्थिक दृष्ट्या मजबूत सुद्धा बनवले जात आहे. ही योजना आर्थिक शिस्त लावते आणि भविष्यासाठी तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते.

या योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी गुंतवणूकदाराला एकूण 17.74 लाख रुपये मिळतात. यामध्ये गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक 15 लाख रुपयांची असते. तसेच उर्वरित 2.74 लाख रुपये व्याज म्हणून गुंतवणूकदाराला रिटर्न मिळतात.

थोडक्यात या योजनेतून गुंतवणूकदाराला पाच वर्षांच्या काळात जवळपास पावणेतीन लाख रुपयांची व्याज मिळते. आरडी योजनेत दरमहा किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या योजनेत कोणत्याही वयोगटातील नागरिकांना गुंतवणूक करता येते. पुरुष असो किंवा महिला कोणीही यामध्ये गुंतवणूक करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News