पोस्टाची ‘ही’ योजना ठरणार गेम चेंजर ! गुंतवणूकदारांचे पैसे होणार डबल, किती वर्षात पैसे दुप्पट होणार?

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. पण या वर्षात बँकांच्या एफडीवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली असल्याने पोस्ट ऑफिसच्या बचत योजना गुंतवणूकदारांसाठी बेस्ट पर्याय ठरत आहेत.

अशा स्थितीत जर तुम्हाला पोस्टाच्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्याच्या मदतीने गुंतवणूकदार आपले पैसे दुप्पट करू शकतात.

पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आलेली टाईम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरते. या योजनेला एफ डी योजना म्हणूनही ओळखतात.

ही योजना एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची आहे. यातील एका वर्षाच्या योजनेत गुंतवणूकदारांना 6.9% दराने व्याज मिळते. दोन वर्षांसाठी सात टक्के, तीन वर्षांसाठी 7.10% व्याज मिळते.

तसेच पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% व्याज मिळते. दरम्यान जर तुम्हाला या योजनेतून तुमचा पैसा दुप्पट करायचा असेल तर तुम्हाला दहा वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.

पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या बचत योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला पुन्हा एकदा ती गुंतवणूक पाच वर्षांसाठी वाढवावी लागणार आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे 10 वर्षांत 7.5% व्याजदरानुसार डबल होणार आहेत.

लक्षात ठेवा की या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज दर चार महिन्यांनी मोजले जाते. यामुळे जर व्याजदरात बदल झाला तर साहजिकच यातून मिळणाऱ्या परताव्याची रक्कम सुद्धा बदलणार आहे.

जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेत 10 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर सदर गुंतवणूकदाराला दहा लाख 51 हजार 175 रुपये मिळणार आहेत. अर्थात पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच लाख 51 हजार 175 रुपये व्याज मिळणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News