Post Office Scheme : तुम्हालाही तुमच्या पत्नीच्या किंवा आईच्या नावाने सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यांना आपल्या घरातील महिलांच्या नावाने सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचे असेल त्यांच्यासाठी पोस्टाच्या बचत योजना फायद्याच्या ठरणार आहेत.
पोस्ट ऑफिस कडून सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. अलीकडे बँकांच्या एफडी योजनांच व्याजदर कमी झाले आहे म्हणून पोस्टाच्या बचत योजना फायद्याचा पर्याय सुद्धा ठरत आहेत.

दरम्यान जर तुमचेही एफडी योजनांचे व्याजदर कमी झाले असल्याने पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणुकीचे नियोजन असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची मंथली इन्कम स्कीम फायद्याचे ठरणार आहे. पोस्ट ऑफिस ची मंथली इनकम स्कीम ही एक सुरक्षित बचत योजना आहे.
ही योजना महिला असो की पुरुष सर्वांसाठी चांगली आहे. परंतु घरातील गृहिणींसाठी ही योजना अधिक खास ठरू शकते. घरातील महिलांना दरमहा किराणा, भाजीपाला यासाठी पैसा लागत असतो. घर खर्चासाठी लागणारा पैसा जर त्यांना कमवायचा असेल तर त्यांच्यासाठी पोस्टाची ही योजना फायद्याची ठरू शकते.
या योजनेत गुंतवणूक करून प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम व्याज स्वरूपात मिळवता येते. यामुळे रिटायर्ड झालेले कर्मचारी आणि महिला या योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. सद्यस्थितीला या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना पोस्टकडून 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
इतर योजनांच्या तुलनेत हे व्याजदर फारच अधिक आहे आणि यामुळे ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा ठरते. या योजनेत गुंतवणूकदारांना सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन करता येते. सिंगल अकाउंट ओपन केल्यास जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.
पण जॉईंट अकाउंट ओपन केले तर पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येईल. जर समजा या योजनेत एखाद्याने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना दर महिना 616 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 3 हजार 83 रुपयांचे व्याज मिळणार आहे. जर समजा नऊ लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर प्रत्येक महिन्याला पाच हजार 550 रुपयांचे व्याज मिळणार आहे. ही योजना पाच वर्षाची आहे.
म्हणजे गुंतवणूक केल्यानंतर पुढील पाच वर्ष गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला व्याज मिळणार आहे. पाच वर्षे पूर्ण झालेत की गुंतवणूकदाराची मूळ रक्कम सुद्धा त्याला रिटर्न मिळणार आहे. महत्वाची म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम पुन्हा त्याच योजनेत गुंतवता येणे शक्य आहे.













