Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर बँकांकडूनही एफ डी वरील व्याजदर कमी केले जात आहेत. यामुळे अनेकजण FD ऐवजी इतर ठिकाणी गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. तर काही लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. अशा स्थितीत जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाची एक योजना फायद्याची ठरणार आहे.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही पोस्टाची एक लोकप्रिय बचत योजना असून यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले व्याज मिळते. या योजनेत जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला दर तीन महिन्यांनी 61 हजार 500 रुपयांपर्यंतच व्याज मिळणार आहे.
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन करण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.2% दराने व्याज दिले जाते.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलत मिळते. ही योजना पाच वर्षांची आहे. यात सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन करता येते. या योजनेत गुंतवणूकदारांना एकदा पैसे गुंतवावे लागतात.
यानंतर मग त्यांना दर महिन्याला व्याजाचा पैसा मिळतो. दर तीन महिन्यांनी या योजनेतून व्याजाचे पैसे मिळत असतात. व्याजाचा पैसा या योजनेत गुंतवला तर तुम्हाला कोणतेच रिटर्न मिळणार नाहीत.
जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही योजनेचे व्याज थेट तुमच्या बचत खात्यात वर्ग करू शकता. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. व्हीआरएस घेऊन सेवानिवृत्त झालेले नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी देखील त्यात सामील होऊ शकतात.
55 – 60 वर्षांचे VRS घेऊन सेवानिवृत्त झालेले नागरी कर्मचारी यात सहभागी होऊ शकतात. संरक्षण क्षेत्रातील 50 – 60 वर्षांचे व्हीआरएस घेतलेले सेवानिवृत्त कर्मचारी यासाठी पात्र राहतील. पती -पत्नी हे खाते एकत्र उघडू शकतात.
ह्या खात्याचा कालावधी 5 वर्षे आहे, जो गुंतवणूकदार स्वत: च्या इच्छेनुसार जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवू शकतो. कालावधी वाढविण्यासाठी संबंधित फॉर्म पोस्ट ऑफिसला सबमिट करणे आवश्यक आहे. योजनेच्या शेवटी गुंतवलेली मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळते.
समजा आपण आपल्या पत्नीसह 30 लाख रुपयांची संयुक्त गुंतवणूक गुंतवणूक केली तर दर तीन महिन्यांनी आपल्याला व्याज म्हणून सुमारे 61,500 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला 5 वर्षात 12,30,000 रुपये व्याज मिळणार आहे.