Post Office Scheme : तुम्ही बँकांच्या एफ डी योजनेतून कमी रिटर्न मिळताहेत म्हणून चिंतेत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण बँकांच्या एफडी योजनांपेक्षा अधिक व्याज देणाऱ्या पोस्टाच्या काही बचत योजनांची माहिती पाहणार आहोत.
खरे तर 2025 हे वर्ष बँक एफडी करणाऱ्यांसाठी निराशा जनक राहिले आहे. या वर्षात आरबीआयने रेपोरेट मध्ये मोठी कपात केली असल्याने बँकांच्या एफडी योजनांचे व्याजदर सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे आता बँक एफडी ऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे.

अनेक जण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत तर काहीजण सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहे. दरम्यान आज आपण बँक एफ डी पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या पोस्टाच्या सुरक्षित बचत योजनेबाबत माहिती पाहणार आहोत.
या आहेत पोस्टाच्या सुरक्षित बचत योजना
सुकन्या समृद्धी योजना : ही बचत योजना फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. ही पूर्णपणे करमुक्त बचत योजना असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 8.20% दराने व्याज दिले जात आहे.
सीनियर सिटिझन सेव्हिंग्स स्कीम (SCSS) : ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना यामध्ये पैसा गुंतवता येतो. यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 8.2% दराने व्याज दिले जात आहे.
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) : पोस्टाच्या या योजनेत सद्यस्थितीला 7.7% दराने व्याज दिले जात आहे. यात करसवलत आणि सुरक्षित परतावा मिळतो. 10,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर 14,490 रुपये मिळतात.
किसान विकास पत्र : या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे काही महिन्यात दुप्पट होतात. या योजनेचा परिपक्व कालावधी 115 महिने असून या 115 महिन्यांच्या काळात या योजनेत गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
महिला सन्मान बचत पत्र : ही योजना फक्त महिलांसाठी असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना 7.50% दराने व्याज दिले जात आहे. यात दहा हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटी वर 11,602 रुपये मिळतात. अर्थात एक हजार 602 रुपये रिटर्न मिळतात.
पाच वर्षांची टाइम डिपॉझिट योजना : पोस्टाच्या टीडी योजनेला एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते. पाच वर्षांच्या टीडी योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.50% दराने व्याज दिले जाते.
मंथली इनकम स्कीम : MIS ही पोस्टाची एक लोकप्रिय योजना आहे आणि यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सद्यस्थितीला 7.40% दराने व्याज दिले जाते. या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यास महिन्याकाठी निश्चित व्याज मिळते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड : या योजनेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांची टाईम डिपॉझिट योजना : पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे.
दोन वर्षांची टाईम डिपॉझिट योजना : या सुरक्षित बचत योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना सात टक्के दराने व्याज दिले जाते.
एक वर्षाची टाईम डिपॉझिट योजना : यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्ट टाकून 6.90% दराने व्याज दिले जात आहे.













