नोकरीचं टेन्शनचं राहणार नाही ! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून दरमहा 61,000 रुपयांची कमाई होणार ! कशी आहे योजना ?

Published on -

Post Office Scheme : तुम्हालाही पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करायची आहे का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत जिथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला 61 हजार रुपयांपर्यंत कमाई करता येणार आहे. खरंतर या वर्षात बँकांच्या FD योजनांचे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी केले आहे. पण सरकारी बचत योजनांचे तसेच पोस्टात सुरू असणाऱ्या बचत योजनांच व्याजदर आजही कायम आहे.  यामुळे अनेकजण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत आहे.

पोस्ट ऑफिस मध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी बचत योजना सुरू आहेत. दरम्यान आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेबाबत माहिती पाहणार आहोत. ही एक सरकारी बचत योजना आहे. या योजनेसाठी तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत अकाउंट ओपन करू शकता.

ही योजना लॉन्ग टर्म मध्ये ज्यांना गुंतवणूक करायचे आहे त्यांच्यासाठी फायद्याची ठरेल. ही योजना पंधरा वर्षांची आहे. परंतु योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना परत याचा कालावधी एक्सटेंड करता येतो. या योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवलेला पैसा हा टॅक्स फ्री आहे.

या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना एक कोटी रुपयांचा फंड जमा करता येऊ शकतो. जर तुम्हाला एक कोटी रुपये एकाच वेळी घ्यायचे नसतील तर तुम्ही 61 हजार रुपये महिना या पद्धतीने व्याजाचा लाभ घेऊ शकता. पण 61 हजार रुपये महिना कमवायचा असेल तर काय करावे लागणार याबाबत माहिती पाहूयात. 

पीपीएफ योजनेत एकूण 25 वर्षांसाठी वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच दर महिन्याला बारा हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना एक कोटी रुपयांचा फंड जमावता येऊ शकतो. सध्या पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.1% दराने व्याज दिले जात आहे.

आता हेच व्याजदर पुढील 25 वर्ष कायम राहिले तर गुंतवणूकदारांना आपले ध्येय साध्य करता येईल. दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास पंधरा वर्षांनी गुंतवणूकदारांना 40.68 लाख रुपये मिळतील. यात गुंतवलेली रक्कम आणि व्याज दोघांचा समावेश असेल.

पण जर ही योजना पुन्हा पाच वर्षांसाठी वाढवली तर गुंतवणूकदारांना 66.58 लाख रुपये मिळतील. आता पुन्हा ही योजना पाच वर्षांसाठी वाढवली तर एक कोटी तीन लाख 8 हजार 15 रुपये मिळणार आहेत.

आता जर तुम्हाला 25 वर्षे झाल्यानंतरही ही रक्कम काढायची नसेल तर तुम्हाला या गुंतवलेल्या रकमेवर दरवर्षी 7.31 लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात या रकमेवर गुंतवणूकदारांना दर महिन्याला 60 हजार 941 रुपयांचे व्याज मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe