पोस्टाची ‘ही’ योजना बनवणार मालामाल ! 5 वर्षात मिळणार 17 लाखांचे रिटर्न 

Published on -

Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. खरंतर 2025 च्या सुरुवातीपासून बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर कमी केले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी देखील फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात केली आहे.

यामुळे आता सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांऐवजी पोस्टाच्या बचत योजनांना प्राधान्य दिले जात आहे. पोस्टाकडून जवळपास सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी योजना चालवल्या जातात. किसान विकास पत्र, सीनियर सिटीजन सेविंग स्कीम तसेच मंथली इनकम स्कीम सारख्या योजनांमधून ग्राहकांना चांगला परतावा मिळतो.

याव्यतिरिक्त पोस्ट एफडी, आरडी सारख्या योजना सुद्धा राबवत आहे. दरम्यान आज आपण पोस्टाच्या आरडी योजनेची माहिती पाहणार आहोत. आरडी योजनेत दरमहा एक निश्चित रक्कम गुंतवून पाच वर्षांनी गुंतवणूकदारांना चांगला मोठा फंड जमा करता येऊ शकतो.

या योजनेत गुंतवणूकदारांनी प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी त्याला 17 लाख रुपये मिळणार आहेत. कारण की पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सद्यस्थितीला 6.5% दराने व्याज दिले जात आहे.

अर्थात इतर काही बचत योजनांशी अन बँकांच्या एफडी योजनेसोबत तुलना केली असता हे व्याजदर गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे आहे. महत्वाची बाब म्हणजे यात गुंतवणूकदाराला चक्रवाढ व्याज मिळते. अर्थात व्याजावर व्याज मिळते.

अशा स्थितीत जर तुम्ही पोस्टाच्या आरडी योजनेत दरमहा 25 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षात 17 लाख 74 हजार 771 रुपये मिळतील. यामध्ये तुमची स्वतःची गुंतवणूक 15 लाख रुपयांची राहील आणि उर्वरित पैसे तुम्हाला व्याज स्वरूपात रिटर्न मिळतील.

म्हणजे पाच वर्षात तुम्हाला दोन लाख 74 हजार 771 रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे. यात गुंतवणूकदारांना किमान शंभर रुपयांची गुंतवणूक करता येते. तसेच कमाल गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा सेट नाही. म्हणजे गुंतवणूकदाराला जेवढा पैसा हवा तेवढा तो यामध्ये गुंतवू शकतो.

आरडी योजना वेळेआधी बंद करता येते पण यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. आरडी योजनेचा कालावधी पूर्ण होण्याआधी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला पैसे मिळतात.

आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला एका निश्चित तारखेपूर्वी पैसे जमा करावे लागतात नाहीतर मग गुंतवणूकदाराला शंभर रुपयाला एक रुपया प्रमाणे दंड भरावा लागतो. पोस्टाचे आरडी अकाउंट दोन-तीन लोक मिळून उघडले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe