Post Office Scheme : सुरक्षित गुंतवणुकीत बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे मात्र असे असले तरी आजही काही लोक सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनांना विशेष महत्त्व दाखवले जाते. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचती योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यात एक लाखाचे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 45 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.

आज आपण ज्या पोस्टाच्या योजनेबाबत माहिती पाहणार आहोत त्या योजनेला पोस्टाची टीडी योजना म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिस ची टाईम डिपॉझिट योजना ज्याला एफ डी योजना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कारण की या योजनेचे स्वरूप अगदीच एफडी योजनेसारखे आहे. यामध्ये एक रकमी गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणूक कालावधी भिन्न असतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदारांना एक वर्ष, दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.
किती व्याज मिळते
पोस्टाच्या टीडी योजनेत एका वर्षासाठी 6.9% व्याज मिळते, दोन वर्षांसाठी सात टक्के व्याज मिळते, तीन वर्षांसाठी 7.10% व्याज मिळते आणि पाच वर्षांसाठी 7.50% दराने व्याज दिले जाते.
या योजनेत गुंतवणूकदारांना किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते तसेच कमाल गुंतवणुकीची कोणतेच मर्यादा सेट करण्यात आलेले नाही. अर्थात गुंतवणूकदाराला हवी तेवढी रक्कम तो या योजनेत गुंतवू शकतो आणि त्यावर त्याला एक फिक्स व्याज मिळणार आहे.
या योजनेचे आणखी एक विशेषता म्हणजे यामध्ये सिंगल अकाउंट ओपन करता येते सोबतच जॉइंट अकाउंट सुद्धा ओपन करता येऊ शकते. जॉइंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना सामील करता येते.
कसे मिळणार 45 हजाराचे व्याज ?
पोस्ट ऑफिसच्या सात महिन्यांच्या म्हणजेच पाच वर्ष कालावधीच्या एफडी योजनेत एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास सध्याच्या 7.50% व्याजदराने गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर एक लाख 44 हजार 995 रुपये मिळणार आहेत. अर्थात गुंतवणूकदाराला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर साधारणता 45 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.