Post Office Scheme : आपण सर्वजण आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी आपण वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करतो. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावतात.
काही लोक प्रॉपर्टी मध्ये पैसे गुंतवतात. पण अनेकांना सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असतो. कमी रिटर्न मिळत असतील तरी चालेल पण सुरक्षित रिटर्न हवेत अशी अनेकांची धारणा असते.

यासाठी अनेकजण पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवतात. दरम्यान जर तुम्हालाही पोस्टाच्या बचत योजनांमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर आजची बातमी खास ठरणार आहे.
आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दरमहा एक निश्चित रक्कम व्याज स्वरूपात मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम हिच ती योजना आहे ज्यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट ओपन करता येते.
सिंगल अकाउंट ओपन करून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि जॉईंट अकाउंट ओपन करून गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात.
योजनेत गुंतवलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना 7.4% व्याज दिले जात आहे. या योजनेत किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. ही योजना पाच वर्षांची आहे. यातुन तुम्ही दरमहा एक गॅरंटीड इन्कम मिळवू शकता.
जर तुम्हाला या योजनेतून प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे रुपयांचे व्याज मिळवायचे असेल तर तुम्ही यात किती गुंतवणूक करायला हवी याचे आता आपण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात.
समजा एखाद्या सिंगल अकाउंट होल्डरने या योजनेत जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला 7.4% दराने व्याज मिळणार आहे.
नऊ लाखाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला पाच हजार पाचशे रुपयांच व्याज मिळेल. त्याचवेळी जॉईंट अकाउंट ओपन केल आणि त्यामध्ये 15 लाखाची गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला 9250 मासिक व्याज मिळणार आहे.