फक्त 416 रुपयांची गुंतवणूक बनवणार करोडपती! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळणार सर्वाधिक लाभ

Published on -

Post Office Scheme : तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरेतर गेल्या काही वर्षांमध्ये बँकांच्या एफडी योजनेत तसेच पोस्टाच्या बचत योजनांमधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. शेअर मार्केट मधील अस्थिरपणा गुंतवणूकदारांना भयभीत करणार आहे.

यामुळे शेअर मार्केट ऐवजी आता सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात आहे. अशा स्थितीत जर तुम्ही ही पोस्टाच्या सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी पोस्टाची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना फायद्याची ठरणार आहे.

खरे तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेसाठी तुम्हाला पोस्टात तसेच बँकांमध्ये अकाउंट ओपन करता येईल. ज्या लोकांना लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट राहील. ही योजना पंधरा वर्षांची असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पोस्टकडून चांगले व्याज दिले जात आहे.

योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून या योजनेला सरकारचे समर्थन आहे. योजनेचा कालावधी पंधरा वर्षांनी पूर्ण होतो मात्र गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास त्यांना या योजनेचा कालावधी वाढवता सुद्धा येऊ शकतो.

म्हणजेच गुंतवणूकदार त्यांच्या सोयीने वीस वर्षांसाठी किंवा मग पंचवीस वर्षांसाठी सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकतात. पीपीएफ योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे फक्त 416 रुपयांच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना एक कोटी रुपयांचा फंड जमा करता येणार आहे.

गुंतवणूकदारांनी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत दरमहा 12500 रुपयांची गुंतवणूक सुरू केली आणि हे गुंतवणूक सलग 25 वर्ष कायम ठेवली तर त्यांना गुंतवणुकीवर एक कोटी रुपयांचा फंड मिळणार आहे. पीपीएफ योजनेत वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

पीपीएफमध्ये यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली संपूर्ण रक्कम करमुक्त असते. आता आपण पीपीएफ योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास पंधरा वर्षे, वीस वर्ष आणि 25 वर्षानंतर किती रिटर्न मिळणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

25 वर्ष – दररोज 416 रुपये म्हणजेच वार्षिक दीड लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास 25 वर्षांनी 1.03 कोटी रुपये मिळतील. यात गुंतवणूकदाराची गुंतवणूक फक्त 37.50 लाखांची राहील.

वीस वर्ष – दरमहा 12500 रुपयांची गुंतवणूक केल्यास वीस वर्षांनी 67.69 लाख रुपये मिळतील.

15 वर्ष – 416 रुपयांची डेली गुंतवणूक गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी वर 41.35 लाख रुपये देणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe