Post Office : जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना तुमच्यासाठी सर्वात उत्तम ठरेल. विशेष म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच चांगला परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम असे या पोस्ट ऑफिसच्या शानदार योजनेचे नाव आहे. ही योजना एक प्रकारे FD सारखीच आहे. या योजनेची खासियत म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीवर फक्त 2.25 लाखांच मिळत आहे. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करू शकता.
जाणून घ्या पोस्ट ऑफिस टीडी योजनेतील व्याज
व्याजदराचा विचार केला तर पोस्ट ऑफिसच्या 1 वर्षांच्या TD योजनेवर 6.90 टक्के आणि 2 वर्षांसाठी 7 टक्के व्याजदर दिले जात आहे. तसेच 3 वर्षांच्या ठेवीवर 7 टक्के आणि 5 वर्षांच्या ठेवीवर 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की हे व्याजदर 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे.
मिळेल 2.25 लाख व्याज
पोस्ट ऑफिस टीडीनुसार, समजा तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केल्यास मॅच्युरिटी रक्कम 7 लाख 24 हजार 974 रुपये इतकी होणार आहे. या व्याजातून 2 लाख 24 हजार 974 रुपये मिळतात. या पोस्ट ऑफिस लघु बचत योजनांच्या ठेव दरांचा दर तिमाहीत सरकारकडून आढावा घेण्यात येतो. याचा अर्थ व्याज दर प्रत्येक तिमाहीमध्ये बदलतात. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुदत ठेवीमध्ये, ठेवीच्या वेळी निश्चित व्याजदर पूर्ण मुदतपूर्तीपर्यंत राहतो.
मिळेल कर सवलत
गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या टीडीवर कर सवलतीचा लाभ मिळत आहे. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत उपलब्ध आहे. हे लक्षात ठेवा की TD मध्ये मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम करपात्र आहे.
सर्वात आनंदाची बाब म्हणजे पोस्ट ऑफिस टीडी अंतर्गत एकल खाते आणि संयुक्त खाते दोन्ही उघडता येते. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढांचा समावेश केला जाईल. या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 1,000 रुपयांचे खाते चालू करू शकता. यानंतर, तुम्ही यात 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. हे लक्षात ठेवा की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही.