Post Office : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोस्टाच्या टॉप 5 गुंतवणूक योजना, जबरदस्त मिळेल परतावा !

Content Team
Published:
Post Office

Post Office : भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे असते, भविष्यात जर तुम्हाला तुमचे आयुष्य अगदी आरामात जगायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी आतापसूनच गुंतवणूक करणे फार फार महत्वाचे आहे. जर तुम्ही आतापासून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला तर, तुम्हाला त्याचे फायदे दीर्घकालीन मिळतील. दरम्यान आज आम्ही तुम्हाला सरकारच्या सर्वाधिक परतावा देणाऱ्या 5 योजनांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. सरकारच्या या योजनेत तुम्हाला उत्तम परतावा मिळतो.

किसान विकास पत्र

सरकारकडून चालवली जाणारी किसान विकास पत्र (KVP) ही एक निश्चित दराची छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. पोस्ट ऑफिसची ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. सध्या या योजनेवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये किंवा 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. येथे जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्ही कितीही खाती उघडू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना

सरकारद्वारे चालवली जाणारी तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजना देखील तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपयांसह खाते उघडू शकता. हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत किंवा नियुक्त बँक शाखेत उघडता येते. या खात्यात तुम्ही एका आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. 1 जानेवारी 2023 पासून ही योजना वार्षिक 7.1 टक्के व्याज देत आहे. PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे.

सुकन्या समृद्धी खाते

मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारतर्फे सुकन्या समृद्धी योजना चालवली जात आहे. या योजनेत हमी व्याज उपलब्ध असून चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील मिळतो. सध्या या योजनेवर ८ टक्के व्याज दिले जात आहे. SSY मध्ये किमान गुंतवणूक 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करता येऊ शकतात.

पोस्ट ऑफिस बचत खाते

पोस्ट ऑफिस बचत खात्यात किमान 500 रुपये असणे आवश्यक आहे. जर रक्कम कमी असेल आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी या मर्यादेपेक्षा कमी राहिली तर 50 रुपये देखभाल शुल्क वजा केले जाईल. यामध्ये तुम्हाला वर्षाला ४.०% दराने व्याज मिळते. बँकांप्रमाणेच तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावरही अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे

NSC ची ही योजना कोणतीही जोखीम न घेता हमी उत्पन्न मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. NSC व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.7 टक्के वार्षिक करण्यात आले आहेत. पोस्ट ऑफिसच्या या लहान बचत योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. त्याच वेळी, यामध्ये अनेक खाती उघडता येतात. NSC मध्ये ठेवींवर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ देखील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe