Post Office : अनेक गुंतवणूकदार जोखीमेशिवाय परतावा मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात. परंतु जर आता तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा जास्तीत जास्त परतावा पाहिजे असेल तर पोस्ट ऑफिसमधील बचत योजना फायदेशीर ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांवर तुम्हाला आकर्षक व्याज मिळेल.
या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला सुरक्षेची तर हमी मिळतेच परंतु तुम्हाला कर सवलतीचा लाभ ही मिळेल. हे लक्षात घ्या की पोस्ट खात्यातील काही योजनांमध्ये सरकारकडून तीन महिन्यांसाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. तसेच पोस्ट खात्याच्या वेगवेगळ्या बचत योजनांमधील व्याजदर जवळपास सर्वच बँकांपेक्षा खूप जास्त आहे.

ही पोस्ट ऑफिस योजना ग्राहकांना देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय FD पेक्षा सर्वात जास्त व्याज देत आहे. एसबीआय 5 वर्षांच्या FD वर वार्षिक 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. इतकेच नाही तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम 5 वर्षांच्या ठेवींवर आपल्या ग्राहकांना 7.5 टक्के व्याज देत आहे.
जाणून घ्या 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर करण्यात आलेली मुदत
पोस्ट ऑफिस आता 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत देत आहेत. हे लक्षात ठेवा की बँक एफडी प्रमाणे, आपल्या गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममधून जबरदस्त परतावा मिळू शकतो.
- 1 वर्ष – 6.90 टक्के
- 2 वर्षे – 7.00 टक्के
- ३ वर्षे – 7.00 टक्के
- 5 वर्षे – 7.50 टक्के
कोणाला चालू करता येते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये खाते?
- आता तुम्हालाही या योजनेत एकल खाते उघडता येते.
- आता तुम्ही हे खाते दोन किंवा तीन लोकांसह संयुक्त खाते चालू करू शकता.
- इतकेच नाही तर तुम्ही हे खाते पालकांच्या देखरेखीखाली अल्पवयीन मुलासाठी (10 वर्षांपेक्षा जास्त) चालू करू शकता.
जाणून घ्या या योजनेची खास वैशिष्ट्ये
- व्याज दर – 7.5 टक्के
- गुंतवणुकीची रक्कम – 5 लाख
- मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम – रु 7,24,974 (5 वर्षे)
- व्याज लाभ – रु 2,24,974