PPF Scheme : पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! सरकारने दिली ‘ही’ माहिती ; आता ..

Ahmednagarlive24 office
Published:

PPF Scheme : भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये यासाठी आज अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहे. यातच आपल्या देशात केंद्र सरकारने लोकांचा आर्थिक हित लक्षात घेऊन अनेक योजना सुरु केले आहे. ज्याच्या लोकांना मोठा फायदा देखील होत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड होय.

तुम्ही देखील या योजनेत गुंतणवूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला या योजनेत 7.1 टक्के दराने व्याज मिळतो तसेच एक व्यक्ती या योजनेत तब्बल 1.5 लाखांची एका वर्षात गुंतणवूक करू शकतो. पण जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिन्याची 5 तारीख तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही 5 तारखेपर्यंत पैसे जमा केले तर 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यान जे काही शिल्लक असेल ते त्या महिन्यात व्याज जोडले जाईल.

पण जर तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर त्यावर पुढील महिन्यापासून व्याज मिळेल यामुळे तुम्हाला वर्षातून केवळ 11 महिनेच व्याज मिळते आणि तुमचे नुकसान होऊ शकते. पण जर तुम्ही 5 तारखेला पैसे जमा केले तर तुम्हाला एका वर्षात 10,650 रुपये व्याज मिळू शकतील. केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही PPF मध्ये 5 तारीख लक्षात ठेवून गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक नफा मिळेल.

PPF-Calculator-1200x675

हे लक्षात ठेवा कि PPF मध्ये एखादी व्यक्ती एकावेळी एकच खाते उघडू शकते. जर एखाद्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल तर त्याचे खाते बंद केले जाते आणि त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. तसेच पीपीएफ खाते विलीन करता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीने 2015 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल आणि 2020 मध्ये दुसरे खाते उघडले असेल तर नंतर उघडलेले खाते बंद केले जाईल आणि त्यावर व्याज दिले जाणार नाही.

हे पण वाचा :- Mahashivratri 2023: महाशिवरात्रीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे येणार ‘अच्छे दिन’ ! होणार आर्थिक लाभ ; वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe