PPF Scheme: तुमच्या मुलाला करोडपती बनवेल PPF योजना? कसे ते जाणून घ्या….

Published on -

PPF Scheme:- प्रत्येक पालकांना आपल्या पाल्यांच्या भविष्याबाबत काळजी असते व त्यामुळे प्रत्येक पालक त्यांच्या मुलांचे भविष्य मग ते आर्थिक दृष्टिकोनातून असो किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असो ते उज्वल करण्यासाठी मुलं लहान असल्यापासूनच नियोजन करत असतात. यामध्ये मुलांचे शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते व त्या दृष्टिकोनातून मुलांचे भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असावे हे देखील तितकेच गरजेचे असते. म्हणून बहुतेक पालक मुलाच्या जन्मापासूनच त्यांच्यासाठी गुंतवणूक करण्याचा प्लॅन करतात. याकरिता अनेक गुंतवणूक योजनांचा पर्याय वापरून त्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करतात. अशाप्रकारे तुम्हाला देखील तुमच्या मुलाच्या नावाने गुंतवणूक सुरू करायची असेल तर पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अतिशय फायद्याची असून या योजनेत गुंतवणूक केली तर यावर 7.1% वार्षिक व्याज सध्या दिले जात आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहजपणे जमा करू शकतात. चला तर मग आपण या लेखात पीपीएफ योजनेबद्दल थोडक्यात माहिती बघू.

पीपीएफ योजनेबद्दल महत्त्वाची माहिती

या योजनेमध्ये जर एखाद्या व्यक्तीला खाते उघडायचे असेल तर तो स्वतःच्या नावाने एकच पीपीएफ खाते उघडू शकतो. परंतु स्वतःच्या पीपीएफ खात्याऐवजी एखाद्या व्यक्तीला त्याच्या अल्पवयीन मुलाच्या नावाने दुसरे पीपीएफ खाते उघडता येऊ शकते. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी की पालक फक्त एकाच मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतात. या योजनेचा नियम जर बघितला तर त्यानुसार एखाद्याला दोन मुले असतील तर एका अल्पवयीन मुलाचे खाते आईला व दुसऱ्याचे वडिलांना उघडता येते. तसेच अल्पवयीन मुलाच्या पीपीएफ खात्यासाठी एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी ठेव मर्यादा ही पाचशे रुपये आहे तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये आहे. परंतु पालकांचे स्वतःचे या योजनेत खाते असेल तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या खात्यासाठी आणि अल्पवयीन मुलांच्या पीपीएफ खात्यासाठी एकत्रित जास्तीत जास्त ठेव मर्यादा वर्षाला दीड लाख रुपये इतकी असते.

मुल 18 वर्षाचे झाल्यानंतर पुढे काय?

जेव्हा मुल अठरा वर्षाचे होते तेव्हा पीपीएफ खात्याची स्थिती अल्पवयीन ते प्रौढ करण्यासाठी अर्ज देणे गरजेचे असते व यानंतर अठरा वर्षे पूर्ण झालेला मुलगा त्याचे पीपीएफ खाते स्वतः हाताळू शकतो. पीपीएफ खाते त्याची मुदत पूर्ण होण्याअगोदर देखील बंद केले जाऊ शकते व असे विशेष प्रकरणांमध्ये शक्य आहे. यामध्ये पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पीपीएफ खाते बंद केले जाऊ शकते. खासकरून मुलाला जर उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असेल किंवा एखाद्या आजाराच्या उपचारांकरिता पैसा हवा असेल तर अशा प्रकारे खाते बंद करता येते. नाहीतर तसे पाहायला गेले तर या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा पंधरा वर्षांचा आहे. पंधरा वर्षानंतर तुम्हाला तुमची जमा रक्कम पूर्ण काढता येते. परंतु तुम्हाला पैसा लागत नसेल किंवा तुम्हाला आवश्यकता नसेल तर तुम्ही प्रत्येकी पाच वर्षासाठी दोनदा या योजनेची मुदत वाढवू शकतात.

दुसरे म्हणजे पीपीएफ योजनेत तुम्ही जी काही गुंतवणूक करता त्यावर तुम्हाला कर सवलत देखील मिळते. म्हणजेच तुमची जमा रक्कम आणि त्या रकमेवर मिळणारे व्याज हे संपूर्ण करमुक्त असते. विशेष म्हणजे या योजनेचा व्याजदर दर तीन महिन्यांनी सरकारच्या माध्यमातून बदलला जातो. या योजनेचा फायदा छोट्याशा उदाहरणाने समजून घेतला तर समजा तुम्ही एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला पंधरा वर्षांसाठी गुंतवले तर तुमची साधारणपणे तीन लाख 18 हजार रुपये गुंतवणूक या योजनेत होते व तुम्ही दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर पंधरा वर्षांनी तुम्हाला 6 लाख 37 हजार रुपये मिळतात. या योजनेतील खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन मुलाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडून देखील खाते उघडता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe