PPF Scheme : सध्या लोकांकडे पैसे गुंतवण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपये कमावू शकता. पण काही योजना या जोखमीच्या योजना असतात. अशातच तुम्हाला जोखीममुक्त योजना हव्या असतील आणि परतावाही जास्त हवा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे.
तुम्ही या योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता. कोणती आहे ही योजना चला पाहूया. आम्ही PPF योजनेबद्दल बोलत आहोत, ही योजना तुमच्यासाठी सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी योग्य ठरू शकते.
पोस्ट ऑफिसपासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ही योजना सुरू करता येईल. सध्या PPF अंतर्गत 7.1 टक्के व्याज देखील दिले जात आहे. या योजनेत दरमहा केवळ 500 रुपये गुंतवून तुम्ही सहजपणे करोडपती होऊ शकता.
जर तुम्हाला या योजनेअंतर्गत खाते उघडायचे असेल तर तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्हाला कोणत्याही आर्थिक वर्षात फक्त 500 रुपये गुंतवावे लागतील आणि तुम्ही जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता.
पीपीएफ खात्यातील मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा आहे आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मॅच्युरिटीनंतर संपूर्ण पैसे काढू शकता. मात्र, जर तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही ते आणखी 5 वर्षे वाढवू शकता. लक्षात घ्या मॅच्युरिटी वाढवण्यासाठी तुम्हाला एक वर्ष अगोदर अर्ज करावा लागेल.
5 वर्षे पैसे काढू शकत नाही
जर तुम्ही हे खाते सुरू केले असेल आणि 5 वर्षापूर्वी आपत्कालीन पैसे काढायचे असतील तर तुम्ही ही रक्कम काढू शकत नाही. कारण या योजनेअंतर्गत 5 वर्षांचा लॉकइन कालावधी आहे. या कालावधीनंतर, फॉर्म 2 भरून पैसे काढता येतात. या योजनेतून 15 वर्षापूर्वी पैसे काढल्यास 1 टक्के व्याज कापले जाईल.
कर लाभ
पीपीएफ योजनेत ईईई श्रेणीमध्ये येते. याचा अर्थ या योजनेंतर्गत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर कर लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या व्याजावरही कर लाभ मिळतो. PPF अंतर्गत, आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांचा वार्षिक कर लाभ मिळू शकतो.
500 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंची कमाई
तुम्ही पीपीएफ योजनेंतर्गत मासिक 500 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. या प्रकरणात, तुम्हाला परिपक्वतेवर 1.63 लाख रुपये मिळतील. तर 1 रुपये मासिक गुंतवणूक करणाऱ्यांना 15 वर्षांनंतर 3.25 लाख रुपये मिळतील.