PNB Update : ‘या’ कामासाठी आता पंजाब बँकेच्या ग्राहकांना भरावे लागणार अतिरिक्त शुल्क….

Content Team
Published:
PNB Update

PNB Update : तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर ही बातमी महत्वाची आहे. बँक सध्या तुमच्याकडून या सेवेसाठी अतिरिक्त शुल्क आकारात आहे. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला या नियमामुळे नुकसान होऊ शकते, काय आहे नियम आणि तुम्हाला कसे नुकसान होईल जाणून घेऊया…

आतापासून जर तुम्ही बँकेत बॅलन्स न ठेवता एटीएममध्ये जाऊन रक्कम काढली किंवा शिल्लक रक्कम तपासली तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. बँकेने स्वतःच आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. यासोबतच बँक आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे याबात माहिती देत ​​आहे.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक बँकेचे एटीएम आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला पैसे काढणे सोपे झाले आहे. एटीएमच्या सुविधेमुळे आता ग्राहकांना बँकेत जाऊन तासंतास थांबावे लागत नाही. प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना एटीएमची सुविधा देते, पण बँक या सेवेसाठी शुल्क आकारते. प्रत्येक बँकेचे हे शुल्क वेगवेगळे असतात, तसेच नियमही वेगळे असतात.

अशातच पंजाब बँकेच्या एटीएम नियमानुसार जर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे न ठेवता, एटीएममध्ये जाऊन रक्कम तपासात असाल किंवा पैसे काढण्यासाठी एटीएम वापरत असेल तर त्याला यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

नियमांनुसार, तुम्हाला खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास बँका तुमच्या खात्यातून दंड वजा करतात. याशिवाय, काही वेळा व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक शुल्क आकारते.

पंजाब नॅशनल बँक अयशस्वी व्यवहारांवर जीएसटीसह 10 रुपये आकारते. म्हणजेच, जर तुमच्या खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही आणि शिल्लक तपासण्यासाठी तुम्ही एटीएममध्ये कार्ड वापरले, तर तुम्हाला जीएसटीसह 10 रुपये दंड आकाराला जाईल.

त्याच वेळी, जर तुमच्या खात्यात किमान शिल्लक असेल परंतु काही तांत्रिक समस्येमुळे तुम्ही पैसे काढू शकला नाही आणि व्यवहार अयशस्वी झाला असेल, तर तुम्ही आकारलेल्या दंडाबाबत तक्रार करू शकता.

अशा परिस्थितीत बँक तुम्हाला दररोज 100 रुपये भरपाई देईल. तुम्ही बँकेत अयशस्वी व्यवहारांबद्दल तक्रार केल्यास, तक्रार मिळाल्यानंतर बँक तुमचे पैसे 3 ते 7 दिवसांत परत करेल. त्याच वेळी, तुमचे पैसे 30 दिवसांच्या आत परत न केल्यास, बँक तुम्हाला प्रतिदिन 100 रुपये भरपाई देईल.

अयशस्वी व्यवहाराबद्दल येथे तक्रार करा

तांत्रिक समस्येमुळे तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यास, तुम्हाला बँकेकडे तक्रार करावी लागेल. बँकेने जारी केलेल्या 1800180222 आणि 18001032222 या क्रमांकावर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe