Punjab National Bank : सणासुदीच्या काळात PNB बँकेने आणली जबरदस्त ऑफर, ग्राहकांना होणार फायदा !

Content Team
Published:
Punjab National Bank

Punjab National Bank : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काही सेवा मोफत केल्या आहेत. बँकेने सणासुदीच्या काळात ही घोषणा करून ग्राहकांना खुश केले आहे. बँकेच्या या सुविधेमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या तोंडावर बँकेने केलेली ही घोषणा ग्राहकांसाठी खास ठरणार आहे. चला जाणून घेऊया पंजाब नॅशनल बँकेने कोणती घोषणा केली आहे.

बँकेने आपल्या चालू खातेधारकांसाठी RTGS, NEFT आणि IMPS वरील सेवा शुल्क काढून टाकले आहे. म्हणजेच, आता चालू खातेधारकांना ऑनलाइन पेमेंट करताना शुल्क भरावे लागणार नाहीत. बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली आहे. पीएनबीने ट्विट करून आपल्या ग्राहकांना ही माहिती दिली आहे. सोशल मीडिया पोस्टवर, पीएनबी बँकेने सांगितले की, चालू खात्यावर शुल्क आकारले जाणार नाहीत.

RTGS म्हणजे काय?

RTGS चे पूर्ण नाव रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट आहे. याद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता. UPI मधील व्यवहार आणि मूल्याच्या मर्यादेमुळे काहीवेळा मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करणे खूप कठीण असते. याद्वारे तुम्ही 2 लाख रुपयांहून अधिक ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता.

NEFT म्हणजे काय?

NEFT चे पूर्ण नाव National Electronic Fund Transfer आहे. हे देखील ऑनलाइन पैसे पाठवण्याचे एक साधन आहे. याद्वारे तुम्ही देशात कुठेही पैसे पाठवू शकता. तसेच, NIFT ला पैसे पाठवण्यासाठी कमाल आणि किमान रक्कम निश्चित केलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe