Punjab National Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. मात्र जुनं ते नेहमीच सोनं राहतं. यामुळे आजही गुंतवणुकीसाठी अनेकजण एफडी करण्याला विशेष महत्त्व दाखवतात. ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित गुंतवणूक करायची असते असे गुंतवणूकदार आजही बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात.
अलीकडे तर महिला गुंतवणूकदारांनी देखील एफडी करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोने आणि चांदीऐवजी आता एफडी मध्ये गुंतवणूक करणे विशेष फायद्याचे समजले जाऊ लागले आहे. जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की, आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाब नॅशनल बँक चारशे दिवसांच्या एफडीसाठी किती व्याजदर देते, तसेच या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर त्याला मॅच्युरिटीवर किती अमाऊंट मिळणार याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेची 400 दिवसांची एफडी योजना
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेकडून चारशे दिवसांच्या एफडी साठी 7.25 टक्के एवढे व्याज ऑफर केले जाते. विशेष बाब अशी की बँकेची ही सर्वाधिक व्याजदर असणारी एफडी योजना आहे. यामुळे जर पंजाब नॅशनल बँकेत एखाद्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी 400 दिवसांची ही एफडी योजना बेस्ट पर्याय ठरणार आहे.
आता आपण या योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला किती व्याज मिळू शकते याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तीन लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या एफडी योजनेत तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटी वर तीन लाख 24 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. म्हणजेच तीन लाख रुपये ही गुंतवलेली अमाऊंट आणि 24 हजार रुपये हे व्याज राहणार आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ज्येष्ठ गुंतवणूकदारांना बँकेकडून 0.50 टक्के अतिरिक्त व्याज ऑफर केले जात आहे. अर्थातच पंजाब नॅशनल बँकेच्या 400 दिवसांच्या एफडी साठी जेष्ठ नागरिकांना 7.75% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.