टॅक्स ही वाचवा आणि पैसा तिप्पटीने वाढवा! म्युच्युअल फंडाची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत

करबचतीचे नियोजन करताना अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांचा विचार करत असतात. कारण बऱ्याच गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून कर सवलतीचा लाभ मिळतो व त्यानुसार गुंतवणुकीचे संपूर्णपणे नियोजन केले जाते. कर बचतीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना आहेत

Ratnakar Ashok Patil
Published:
matual fund

Quant Mutual Fund:- करबचतीचे नियोजन करताना अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांचा विचार करत असतात. कारण बऱ्याच गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून कर सवलतीचा लाभ मिळतो व त्यानुसार गुंतवणुकीचे संपूर्णपणे नियोजन केले जाते. कर बचतीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या योजना आहेत

व त्यासोबतच काही बेस्ट असे ELSS फंड देखील महत्त्वाचे असून या फंडांमध्ये केलेली गुंतवणूक कर बचतीसाठी किंवा कर वाचवण्यासाठी फायद्याची ठरते गुंतवणूक केल्यावर परतावा देखील चांगला मिळतो.

अगदी याच पद्धतीने या लेखामध्ये आपण असाच एक ELSS फंडाची माहिती घेणार आहोत ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा पैसा तीन ते चार पटींनी वाढला व त्या माध्यमातून कर बचत देखील शक्य झाली.

करबचत आणि मजबूत परताव्यासाठी फायद्याचा आहे हा ELSS टॅक्स सेव्हर फंड

क्वान्ट ELSS टॅक्स सेव्हर फंड(डायरेक्ट प्लान)-
गुंतवणुकीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा असा टॅक्स सेव्हर फंड असून पाच वर्षाच्या एकरकमी गुंतवणुकीवरून मिळणारा परतावा जर बघितला तर तो तब्बल 32.54 टक्क्यांपर्यंत मिळाला आहे. म्हणजेच यामध्ये जर पाच वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षानंतर तब्बल चार लाख 9 हजार 566 इतके झाले असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर दहा हजार रुपयांची दर महिन्याला एसआयपी केली असती तर पाच वर्षात सहा लाख रुपयांची तुमची गुंतवणूक यामध्ये होते व पाच वर्षानंतर जर वार्षिक परतावा 27.41% पकडला तर गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 11 लाख 80 हजार 713.4 रुपये इतके होते.

जर आपण या फंडाचे एयुएम म्हणजेच व्यवस्थापनाखालील मालमत्ता बघितली तर ती 10730.03 कोटी रुपये आहे. तसेच बेंचमार्क निफ्टी 500 टीआरआयच्या माध्यमातून पाच वर्षात मिळणारा परतावा जर बघितला तर तो 19.01% इतका आहे.क्वान्ट ELSS टॅक्स सेव्हर फंड हा पाच वर्षात सर्वाधिक परतावा देणारा टॉप फंड ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe