रेल्वे कंपनीचा शेअर उसळला, 5 वर्षात दिला 8000% परतावा! गुंतवणूकदारांची खरेदीसाठी रांग

Published on -

Multibagger Stock:- आजच्या शेअर बाजारात रेल्वे क्षेत्राशी संबंधित एका खास कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. केर्नेक्स सिस्टिम्स या कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली उसळी पाहायला मिळाली. दुपारपर्यंत कंपनीचा शेअर तब्बल ५ टक्क्यांनी वधारला आणि त्याची किंमत १३०० रुपयांच्या आसपास स्थिरावली. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं असून कंपनीला तब्बल ३११ कोटी रुपयांचं काम मिळालं आहे.

नवीन प्रकल्पामध्ये केर्नेक्स सिस्टिम्सचा वाटा किती?

या नवीन प्रकल्पामध्ये केर्नेक्स सिस्टिम्सचा वाटा सुमारे ६० टक्के आहे. हे काम चेन्नई विभागात रेल्वेसाठी करण्यात येणार आहे, आणि ही माहिती बाजारात येताच गुंतवणूकदारांनी शेअरवर खरेदीचा मारा केला. परिणामी, कंपनीच्या शेअर्सना ‘अप्पर सर्किट’ लागलं म्हणजे दिवसभरात ठरवलेल्या कमाल दरापर्यंत शेअरने झेप घेतली.

गेल्या काही महिन्यांतील कामगिरी पाहिली, तर केर्नेक्सने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. अवघ्या एका महिन्यात या शेअरमध्ये ६४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि तीन महिन्यांत हा आकडा ८८ टक्क्यांवर पोहोचतो. मात्र, वर्षाच्या सुरुवातीपासून पाहिलं तर यंदा आतापर्यंत थोडी घसरण झाली आहे. सुमारे ८ टक्क्यांनी. तरीसुद्धा, गेल्या वर्षभरात याच शेअरने तब्बल २४६ टक्के परतावा दिला आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही कंपनी म्हणजे एक स्वप्नवत प्रवास ठरलेली आहे. केर्नेक्सचा शेअर गेल्या दोन वर्षांत जवळपास २९५ टक्क्यांनी वाढला आहे. पण विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत या शेअरची किंमत थेट ८० पट म्हणजेच ८००० टक्क्यांनी वाढली आहे. एवढा परतावा देणाऱ्या कंपन्या बाजारात फारच कमी असतात.

कंपनीने 2007 मध्ये 1:10 बोनस शेअर्स दिले होते आणि त्यानंतर 2012 मध्ये एक रुपयाचा लाभांश दिला होता. सध्या कंपनीचे मार्केट कॅप सुमारे २१७९ कोटी रुपये आहे. मार्च तिमाहीनुसार, प्रवर्तकांकडे २९ टक्के हिस्सेदारी असून, उर्वरित ७१ टक्के हिस्सा सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहे. ही हिस्सेदारी गेल्या सप्टेंबरपासून जवळजवळ तशीच राहिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!