Railway Share : अनेकांना शेअर मार्केटमधून बंपर कमाई करायची असते. परंतु हे लक्षात घ्या की तुम्हाला मार्केटमध्ये कधी नफा होतो तर तुम्हाला कधी नुकसानीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणतीही कंपनी किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
तसेच तुम्हीही संपूर्ण शेअर मार्केटची माहिती जाणून घ्या. तेव्हा गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही रेल्वेच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रेल्वेच्या काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
इरकॉन इंटरनॅशनल
इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड अर्थात इरकॉन इंटरनॅशनलचे शेअर्स सोमवारी बीएसईवर 18% पेक्षा जास्त वाढले असून ते 159.25 रुपयांवर पोहोचले आहेत. सोमवारी कंपनीच्या समभागांनी 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम दिसून आला असून या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 133.45 रुपयांवर बंद झाले.
रेल्वे विकास निगम लिमिटेड
सोमवारी रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या देखील शेअर्समध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी बीएसईवर या कंपनीचे शेअर्स 191.40 रुपयांवर पोहोचले आहेत. या शेअर्सने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बीएसईवर रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर 162.80 रुपयांवर बंद झाला होता. मागील एका वर्षात या शेअर्समध्ये 443 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 32.80 रुपये आहे.
IRFC शेअर्स
सोमवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढून 84.76 रुपयांवर पोहोचले. तर या कंपनीच्या शेअर्ससाठी ही 52 आठवड्यांची नवीन उच्च पातळी आहे. मागील 7 दिवसात IRFC चे शेअर्स 68% वाढले आहेत. IRFC च्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्याचे मार्केट कॅप 1.10 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
हे शेअर्सही वाढले
वास्तविक Titagar Rail Systems चे शेअर्स देखील BSE मध्ये 5% पेक्षा जास्त वाढीसह Rs 855 वर गेल्याचे पाहायला मिळाले आहे. टेक्समॅको रेल आणि इंजिनिअरिंगचे शेअर्स 5.5 टक्क्यांच्या उसळीसह 163.85 रुपयांवर गेले आहेत. राइट्स लिमिटेडचे शेअर्स 3% हुन अधिक उडी घेऊन 566 रुपयांवर गेले आहेत.