Railway Ticket:- जेव्हा आपण रेल्वेचा प्रवास करायला निघतो तेव्हा आपल्याला रेल्वे तिकीट बुकिंग करावे लागते व त्यानंतर आपल्याला कन्फर्म सीट मिळत असते. परंतु जर काही गर्दीचा कालावधी म्हणजे सणासुदीचा कालावधी असेल तर मात्र रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे खूप जिकीरीचे होऊन बसते व त्याकरिता काही महिने अगोदरच रिझर्वेशन करावे लागते.
परंतु कधी कधी आपल्याला अचानक कुठे बाहेरगावी जायचा प्रसंग येतो व अशावेळी तात्काळ तिकीट बुकिंग हाच पर्याय आपल्यासमोर राहतो. या प्रकारच्या तिकिटाकरिता आपल्याला जास्तीचे पैसे मोजावे लागतात व अनेकदा हे तिकीट मिळेलच याची देखील शाश्वती नसते. त्यामुळे या लेखात आपण माहिती घेणार आहोत की ट्रेन सुटण्याच्या काही मिनिटे अगोदर देखील कसे तिकीट बुक करावे?
ट्रेन सुटण्यापूर्वी कसे मिळवावे कन्फर्म तिकीट?
तुम्हाला ट्रेन सुरू होण्याच्या किंवा निघण्याच्या काही वेळ आधी कन्फर्म तिकीट घेऊन प्रवास करायचा असेल तर ते देखील शक्य आहे. तुम्ही सध्याच्या तुमच्या तिकीट बुकिंगद्वारे शेवटच्या क्षणी ट्रेनमधील रिकाम्या सीटवर बसून सहजपणे प्रवास करू शकतात. हा एक नियम आहे व त्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही.
तुम्हाला जर अचानक प्रवासाची योजना बनवावी लागली तर तुम्ही रेल्वेच्या करंट तिकीटवर(आयआरसीटीसी करंट बुकिंग) सेवेचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा जर बघितली तर यानुसार ट्रेनमध्ये कुठलीही सीट रिकामी राहू नये याकरिता रेल्वेने करंट तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे.
ट्रेन सुटण्यापूर्वी करंट तिकीट दिली जातात व ट्रेनमध्ये काही जागा रिकामी राहिल्याचे तुम्ही अनेकदा बघितले असेल. जागा किंवा या सीट रिकामे राहू नयेत आणि ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी करंट बुकिंग सेवा देण्यात येते. करंट तिकिटांची बुकिंग तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते.
आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा रेल्वे तिकीट आरक्षण काउंटरवर ट्रेन सुटण्याच्या तीन ते चार तास आधी तिकीट खिडकीवरून करंट रेल्वे तिकिटाची उपलब्धता तुम्ही बघू शकतात आणि ते सीट बुक करू शकतात. करंट तिकिटांचे बुकिंग साधारणपणे ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी सुरू होते व ट्रेनमधील बर्थ रिकामा जर असेल तरच करंट बुकिंग तिकीट दिले जाते.
इमर्जन्सीमध्ये हे करंट तिकीट अतिशय फायद्याचे ठरते. या करंट तिकिटाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रेन सुटण्याच्या पाच ते दहा मिनिटे आधी तुम्ही ते बुक करू शकतात. करंट तिकीट बुकिंगद्वारे कन्फर्म तिकीट मिळवणे हे तात्काळ तिकीट मिळवण्यापेक्षा अतिशय सोपे आहे.विशेष म्हणजे या तिकिटाचे दर सामान्य तिकिटा इतकेच असतात.