RBI Repo Rate:- रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.२५% कमी करून ६.२५% केला आहे. ज्याचा थेट फायदा गृहकर्ज घेणाऱ्यांना होणार आहे. यामुळे कर्जाच्या मासिक हप्त्यांमध्ये (EMI) कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल.
रेपो दर म्हणजे काय आणि तो होमलोनवर कसा परिणाम करतो?
![rbi repo rate](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/repo-r.jpg)
जेव्हा बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यायचे असते तेव्हा त्यावर एक ठराविक व्याजदर लागू असतो.यालाच रेपो दर म्हणतात. हा दर कमी झाल्यास बँकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते आणि त्याचा लाभ ग्राहकांना दिला जातो. त्यामुळे गृहकर्ज, कार लोन किंवा अन्य प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी होतात.
गृहकर्जाचा EMI कमी कसा होईल?
१ ऑक्टोबर २०१९ पासून भारतातील सर्व फ्लोटिंग रिटेल कर्जे रेपो दराशी जोडली गेली आहेत. याचा अर्थ असा की, जेव्हा रेपो दर कमी होतो तेव्हा बँकांना कमी व्याजदरात कर्ज द्यावे लागते.
जर तुमचे गृहकर्ज ऑक्टोबर २०१९ पूर्वीचे असेल आणि ते जुन्या व्याजदर पद्धतीशी (MCLR) जोडलेले असेल तर तुम्ही नवीन कमी झालेल्या व्याजदराचा लाभ घेण्यासाठी कर्जाची पुनर्रचना (Refinancing) करू शकता. यामुळे तुमच्या EMI मध्ये कपात होईल किंवा कर्जाचा कालावधी कमी होईल.
खरंच ५ लाखांची बचत होऊ शकते का?
हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊ.जर एखाद्या व्यक्तीने ७५ लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी ९% व्याजदराने घेतले असेल तर ३६ महिन्यांनंतर व्याजदर ८.७५% झाला तर एकूण कर्जाच्या मुदतीत १.६२ कोटी रुपये व्याज द्यायचे होते.पण आता फक्त १.५७ कोटी रुपये द्यावे लागतील.यामुळे संपूर्ण कर्जाचा कालावधी ७ महिने कमी होईल आणि एकूण ५ लाख रुपये वाचतील.
काय करावे?
जर तुमचे गृहकर्ज असले आणि तुम्हाला कमी व्याजदराचा फायदा घ्यायचा असेल तर बँकेशी संपर्क साधा. EMI कमी करण्यासाठी किंवा कमी कालावधीत कर्ज संपवण्यासाठी पुनर्वित्तपुरवठा (Refinancing) करता येईल. त्यामुळे तुमचे लाखो रुपये वाचू शकतात.
ही संधी होम घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. कमी व्याजदराचा फायदा घेण्यासाठी शक्य तितक्या लवकर योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.