RBI Rules : बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित असतात का? बँक बुडाली तर? खात्यातील पैसे मिळतात का? वाचा

Published on -

रिझर्व्ह बँकेने (RBI) एखाद्या बँकेवर बंदी घालण्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. रिझर्व्ह बँकेने आत्तापर्यंत अनेक बँकांवर बंदी घातली आहे. मग रिझर्व बँकेने बंदी घातल्यावर किंवा एखादी बँक बुडाल्यावर ठेवीदारांच्या पैशाचं काय होते? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण आपण ज्या बँकेत विश्वासाने पैसे ठेवले आहेत, ती बँकच बुडाली तर, आख्या आयुष्याची पुंजी बरबाद होते. अशावेळी रिझर्व बँकेचे काही नियम तुम्हाला माहीत असावेत.

बँकांवर बंदी का घातली जाते?

बँकांनी पैशांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे घडतात. तक्रारी प्राप्त होताच रिझर्व्ह बँक या बँकांची चौकशी करते. सुरुवातीची चौकशीत काही काळेबेरे आढळले तर, रिझर्व्ह बँक या बँकांवर बंदी घालते. या कालावधीत आरबीआय ग्राहकांच्या पैसे काढण्यावर मर्यादा घालू शकते किंवा थांबवू शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहते.

बँक बुडाली तर?

बँक बुडाली किंवा रिझर्व्ह बँकेने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपये परत मिळतात. ग्राहकांचे बँकेत कोट्यवधी रुपये जमा असले तरी त्यांना ५ लाख रुपयेच मिळतात. रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वी स्पष्ट केले होते की ५ लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो. बँक अपयशी ठरल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळतील. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) नियमांनुसार विमा उतरवला जातो.

पैशांसाठी काय नियम आहेत?

एकाच बँकांच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये तुम्ही कितीही पैसे जमा करा. किंवा एखाद्या बँकेत तुमचे स्वतःचे कितीही खाती असू द्या, आरबीआयच्या नियमाप्रमाणे तुम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळू शकतात. कारण तुमचा फक्त 5 लाखांचा विमाच आरबीआयने उतरविलेला असतो.

पैसे कसे वाचवायचे?

तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर संपूर्ण रक्कम एकाच बँकेत ठेवू नका. रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करा. समजा तुमच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये 8 लाख रुपये जमा आहेत. एका बँकेत 4 लाख रुपये आणि दुसऱ्या बँकेतही 4 लाख रुपये आहेत. समजा दोन्ही बँका बुडाल्या. या प्रकरणात, तुम्हाला पूर्ण 8 लाख रुपये मिळतील. कारण विमा नियमांनुसार, तुम्हाला दोन्ही बँकांकडून पूर्ण रक्कम मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe