RBI ची ‘या’ बँकेवर कठोर कारवाई ! ग्राहकांना पैसे काढता येणार का ? वाचा सविस्तर

Banking News : आरबीआय ही देशातील बँकिंग नियमक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशातील सर्व खाजगी तसेच सहकारी आणि सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवले जाते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर कठोर कारवाई देखील होते. गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे.

काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत. तर देशातील काही प्रमुख बँकांवर, सहकारी बँकांवर आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई देखील झाली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय झालेला आहे.

अशातच 31 जानेवारी 2024 ला पेटीएम पेमेंट बँकेवर कठोर कारवाई केली आहे. आता पेटीएम पेमेंट्स बँकेला क्रेडिट व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या ठेवी घेण्यास बंदी घालण्याचा मोठा निर्णय आरबीआय ने घेतला आहे. 29 फेब्रुवारी 2024 नंतर पेटीएम पेमेंट बँकेला बँकिंग सेवा देता येणार नाहीत असे आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.

आपल्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ग्राहकांना त्यांचे पैसे पेटीएम पेमेंट बँकेतून काढता येणार आहेत. यामुळे ग्राहकांना विशेष काळजी करण्याची काही गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या ग्राहकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे.

RBI च्या कारवाईमुळे काय होणार ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने केलेल्या या कठोर कारवाईमुळे आता 29 फेब्रुवारी पासून पेटीएम पेमेंट बँकेला ग्राहकांच्या खात्यांमध्ये किंवा वॉलेट आणि फास्टॅग सारख्या प्रीपेड साधनांमध्ये ठेवी स्वीकारण्यास परवानगी राहणार नाही.

तसेच क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप करण्यास सुद्धा परवानगी मिळणार नाही. पण, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील बचत आणि करंटसह शिल्लक रक्कम कोणत्याही निर्बंधाशिवाय वापरता येणार आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या विहित मर्यादेपर्यंत शिल्लक रक्कम ग्राहकांना वापरता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.