RBI ची मोठी कारवाई; 1-2 नाही तब्बल 11 बँकांचे लायसन्स रद्द ! महाराष्ट्रातील किती बँकांचे लायसन्स रद्द झाले? पहा…

Ahmednagarlive24 office
Published:

Banking News : 2024 हे वर्ष आता समाप्तीकडे आले आहे. येत्या दोन दिवसात हे वर्ष संपणार आहे. यामुळे अनेकजण आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 2024 मध्ये बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2024 मध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तर काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने 2024 मध्ये देशातील 11 बँकांचे परवाने म्हणजेच लायसन रद्द केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बँकांचा देखील समावेश आहे. अशा परिस्थितीत आज आपण 2024 मध्ये आरबीआयने देशातील कोणत्या बँकांचे लायसन्स रद्द केले आहे याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या बँकांचे लायसन्स झाले रद्द आरबीआय देशातील सर्वच बँकांवर लक्ष ठेवून असते. देशातील सर्व बँकांना आरबीआयचे नियम पाळावे लागतात. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर मध्यवर्ती बँकेकडून कारवाई केली जात असते. गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने अशीच कारवाई करत देशातील 11 बँकांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांचा देखील समावेश आहे.

जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक लिमिटेड, बसमत नगर, हिंगोली आणि द सिटी को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, मुंबई या दोन बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलेला आहे. महाराष्ट्रातील या दोन बँकांसमवेतच 1) दुर्गा को-ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड, विजयवाडा, आंध्र प्रदेश 2) श्री महालक्ष्मी मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, दाभोई, गुजरात 3) द हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड हिरीयुर, कर्नाटक

4) सुमेरपुर मर्केंटाइल अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, सुमेरपूर, पाली राजस्थान 5) पूर्वांचल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, गाजीपूर, यूपी 6) बनारस मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड, वाराणसी 7) शिम्शा सहकारी बँक नियमित, मद्दूर, मंडया, कर्नाटक 8) उरावकोंडा को-ऑपरेटिव टाउन बँक लिमिटेड, आंध्र प्रदेश 9) द महाभैरब को-ऑपरेटिव अर्बन बँक लिमिटेड, तेजपूर, आसाम या बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. म्हणजेच या बँकांना आता बँकिंग व्यवसाय करता येणार नाही.

या लायसन रद्द झालेल्या बँकांमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे जमा असतील त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. ज्या लोकांचे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा असतील त्यांनाही फक्त पाच लाख रुपये मिळतील. म्हणजेच एखाद्याचे या बँकेत पाच लाख जमा असतील तर त्यांना सर्व पाच लाख रुपये मिळणार आहेत आणि जर एखाद्याचे सात लाख रुपये जमा असतील तर अशा लोकांना पाच लाख रुपये मिळतील आणि दोन लाख रुपये त्यांचे बुडतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe