10 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांबाबत RBI चा अत्यंत महत्वाचा निर्णय!

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरीसह लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी होणार आहेत. यासोबतच जुन्या नोटा देखील कायदेशीर राहणार आहेत.

Published on -

New 10 and 500 Notes | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. या नोटा महात्मा गांधी (नवीन) मालिकेत अंतर्भूत असतील आणि त्यावर नव्याने नियुक्त झालेले RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षऱ्या असतील. यामुळे चलन प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा-

RBI ने स्पष्ट केले आहे की या नव्या नोटांची रचना सध्याच्या महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 10 आणि 500 रुपयांच्या नोटांप्रमाणेच असेल. त्यामुळे या नोटांमध्ये केवळ गव्हर्नरच्या स्वाक्षरीचा फरक असेल. तसेच आधी जारी झालेल्या सर्व जुन्या नोटा कायदेशीर राहणार आहेत. त्यामुळे जुन्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत, असा खुलासाही करण्यात आला आहे.

या घोषणेमुळे गेल्या महिन्यात जारी झालेल्या 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटांची आठवण होते. त्या नोटांवरही संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. डिसेंबर 2024 मध्ये संजय मल्होत्रा यांनी RBI गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी पूर्वीचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे.

दरम्यान, RBI ची चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee) 7 एप्रिलपासून बैठक घेणार आहे. या बैठकीत 9 एप्रिल रोजी गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करतील. विश्लेषकांच्या मते, रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे. जर हे प्रत्यक्षात घडले, तर रेपो दर 6 टक्क्यांवर पोहोचतील. या निर्णयामुळे कर्ज स्वस्त होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.

कोण आहेत संजय मल्होत्रा?

संजय मल्होत्रा यांच्याविषयी बोलायचं झालं, तर ते 1990 बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी IIT कानपूर येथून संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी (USA) मधून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी ऊर्जा, खाण, महसूल, वित्त व कर विभागात केंद्र व राज्य सरकारात विविध पदांवर काम केले आहे.

दरम्यान, नव्या नोटांच्या घोषणेमुळे चलन व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून, बाजारपेठेतील व्यवहार अधिक गतिमान होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News