RD Scheme: छोटी बचत आणि चांगला पैसा कमवण्यासाठी ‘आरडी’च का आहे उत्तम पर्याय? बघा गुंतवणुकीचे फायदे

Published on -

RD Scheme:- प्रत्येकजण कमावलेल्या पैशांची जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करतात तेव्हा सगळ्यात अगोदर केलेली गुंतवणूक सुरक्षित कोणत्या ठिकाणी राहील व परतावा किती मिळेल? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. यामध्ये बरेचजण बँकेच्या बचत खात्यांना जास्त करून प्राधान्य देतात तसेच मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तसेच एफडी योजना यांना प्राधान्य दिले जाते. परंतु यामध्ये जर आपण रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी या गुंतवणूक प्रकाराचा विचार केला तर हा एक सगळ्यांचा पसंतीचा लोकप्रिय आणि विश्वास असलेला पर्याय म्हणून पुढे आलेला आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण बघू की असे कोणते फायदे आहेत जे आरडीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपल्याला मिळतात.

आरडीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे फायदे

तुम्ही जर आरडीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला शिस्तबद्ध रीतीने बचत करायची सवय लागते व प्रत्येक महिन्याला तुम्ही निश्चित रक्कम जमा करायला सुरुवात करतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही निवडलेली आरडी योजना जेव्हा परिपक्व म्हणजेच मॅच्युअर होते तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या परताव्याची हमी असते. तसेच यामध्ये गुंतवलेला पैसा हा सुरक्षित असतो व कुठल्याही प्रकारची जोखीम यामध्ये नसते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही अगदी शंभर रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व तुमच्या योजनेप्रमाणे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आरडी मधील गुंतवणुकीचा कालावधी बघितला तर तो सहा महिन्यापासून ते दहा वर्षापर्यंत असू शकतो.

चौथा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभ या माध्यमातून मिळतो. पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जर आरडीत गुंतवणूक करायचे असेल तर यासाठी लागणारे खाते तुम्ही कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे उघडू शकतात. सहावा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे म्हणजे तुमची जी काही रक्कम या आरडी खात्यात जमा झालेली असते व तुमच्यावर जर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तुम्ही तुमच्या जमा रकमेच्या 80 ते 90% पर्यंत कर्ज देखील मिळवू शकतात.

तसेच काही विशेष कर बचत एफडी योजनांसोबत तुम्ही कर बचतीचा पर्याय निवडू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही निवडलेले योजनेचा मॅच्युरिटी कालावधी किती का असेना याने काही फरक पडत नाही. तुम्हाला जर वाटले की आता आपल्याला वेळेआधी आरडी खाते बंद करायचे आहे तर तुम्ही गरज असल्यास दंड भरून वेळेआधी देखील खाते बंद करू शकतात व तुमचे पैसे मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe