रियल इस्टेट क्षेत्रातील ‘या’ कंपनीला मिळाले 800 कोटी रुपयांची ऑर्डर ! शेअर्समध्ये आली तुफान तेजी

Published on -

Real Estate : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जे गुंतवणूकदार रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट खास ठरणार आहे. रियल इस्टेट क्षेत्रातील कंपनी महिंद्रा लाइफ स्पेस डेव्हलपर्स लिमिटेडला एका मोठ्या प्रोजेक्टचे काम मिळाले आहे.

मुंबईच्या मलाड वेस्ट भागात या कंपनीला रेडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. चार हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाची जबाबदारी कंपनीला मिळाली असल्याने कंपनीचे शेअर्स आता तेजीत आले आहेत.

हा प्रकल्प महिंद्रा लाईफ स्पेस डेव्हलपर्स लिमिटेड च्या सध्याच्या महिंद्रा कोडनेम 64 जवळ आहे. कंपनीचे चीफ बिझनेस ऑफिसर (रेसिडेन्शियल) विमलेंद्र सिंह यांनी सांगितले की, “हा प्रकल्प मुंबईच्या पुनर्विकास बाजारपेठेत आमची स्थिती अधिक बळकट करेल.

ग्राहक आणि हाउसिंग सोसायट्यांमधील आमच्या ब्रँडवरील विश्वासाचे हे प्रतीक आहे. आम्ही नेहमीच विचारपूर्वक डिझाइन केलेली आणि उच्च गुणवत्तेची घरे देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच अनेक सोसायट्या पुनर्विकासासाठी आम्हालाच पसंती देतात.”

हा नवा विकास प्रकल्प मुंबईच्या एका विकसित निवासी भागात होणार आहे. येथे शाळा, रुग्णालये, रिटेल सेंटर्स आणि व्यवसायिक केंद्रे अशा सर्व नागरी सोयी-सुविधांचा सहज लाभ मिळणार आहे.

विमलेंद्र सिंह यांच्या मते, कंपनीची रणनीती म्हणजे स्थापन झालेल्या भागांमध्ये उपस्थिती वाढवणे, ज्यामुळे इकोनॉमी ऑफ स्केल चा फायदा मिळू शकेल आणि प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवता येईल. आता आपण कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी समजून घेऊयात.

एका वर्षात झाली मोठी घसरण 

कंपनीचे शेअर्स शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 3.50% वाढीसह 369.20 वर बंद झालेत. मागील सहा महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 35.81% परतावा दिला आहे. पण गेल्या एका वर्षात शेअरची किंमत 21.57% नी घसरलीये.

या वर्षात देखील स्टॉकने आतापर्यंत 13.94% नकारात्मक रिटर्न दिले आहेत. आज कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 7,870 कोटी आहे. महिंद्रा लाइफस्पेसचे हे पाऊल मुंबईतील पुनर्विकास क्षेत्रातील स्पर्धा वाढवणारे ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe