स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी खुशखबरी! Jio, Airtel, Vi आणि BSNL ने रिचार्जच्या किमती केल्या कमी

टेलिकॉम क्षेत्रातील युजर्ससाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी जसे की, Jio, Airtel, Vi आणि BSNL ने त्यांच्या कॉलिंग आणि SMS प्लॅन्सच्या किमती कमी केल्या आहेत. ट्रायच्या दृष्टिकोनातून झाले आहेत.

Ratnakar Ashok Patil
Updated:

Recharge Plan Price:- टेलिकॉम क्षेत्रातील युजर्ससाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी जसे की, Jio, Airtel, Vi आणि BSNL ने त्यांच्या कॉलिंग आणि SMS प्लॅन्सच्या किमती कमी केल्या आहेत.

ट्रायने  सर्व कंपन्यांना फक्त व्हॉईस आणि SMS आधारित टॅरिफ प्लॅन्स लाँच करण्याचा आदेश दिला होता. यामुळे कंपन्यांना ज्या वापरकर्त्यांना डेटा वापरण्याची आवश्यकता नाही. त्यांना अधिक खर्च न करता परवडणारे पर्याय उपलब्ध होऊ शकतात.

ट्रायने दिली होती सूचना

TRAI च्या सूचनेनुसार Jio, Airtel आणि VI या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये बदल केले. Jio ने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमती कमी करून 458 रुपयांऐवजी 448 रुपये केले आहेत.

ज्यामध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 SMS मिळतात. तसेच जिओचा एक वर्षाचा व्हॅलिडिटी प्लॅन 1159 रुपयांऐवजी आता 1748 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

एअरटेलने कमी केल्या किमती

एअरटेलने देखील आपला प्लॅन बदलला आहे. 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कॉलिंग आणि SMS केवळ प्लॅनची किंमत 499 रुपयांऐवजी आता 469 रुपये झाली आहे.ज्यात 900 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तसेच एअरटेलच्या 1159 रुपयांच्या प्लॅनची किंमत 1889 रुपये झाली आहे. ज्यात 3600 SMS आणि एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे.

Vi आणि BSNL ने  किमती केल्या कमी

Vi आणि BSNL कडून देखील किमती कमी करण्यात आल्या आहेत. Vi 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 900 SMS साठी 470 रुपये घेत आहे. तसेच 1849 रुपयांच्या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 SMS मिळतात.

BSNL ने 300 SMS आणि 17 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉलिंग 99 रुपयांमध्ये उपलब्ध केली आहे. तसेच 439 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 SMS मिळतात.

या बदलांमुळे ज्या वापरकर्त्यांना डेटाची गरज नाही आणि फक्त कॉलिंग व SMS च्या सेवेची आवश्यकता आहे.त्यांच्यासाठी आता सुलभ आणि परवडणारे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe