Recurring Deposit : गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय, ‘या’ बँका RD वर देत आहेत सर्वोत्तम व्याजदर !

Published on -

Recurring Deposit : तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचे पैसे RD मध्ये गुंतवू शकता. RD मधील गुंतवणूक ही जर महिन्याला करावी लागते. तुम्हाला येथे एकाचवेळी मोठी रक्कम जमा करण्याची गरज नसते. तुम्ही तुमचा एक कालावधी निवडून जर महिन्याला त्यात तुमची ठराविक रक्कम गुंतवू करू शकता.

तुमच्याकडे एकाच वेळी जास्त पैसे नसतील, आणि तुम्हाला भविष्यासाठी बचत करायची असेल, तर आवर्ती ठेव तुमच्यासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो. रिकरिंग डिपॉझिटमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवली जाते. प्रत्येक मासिक गुंतवणुकीवर प्री-फिक्स्ड व्याज उपलब्ध असतात. हे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सारखे कार्य करते. अशातच जर तुम्हाला RD मध्ये गुंतवणूक करण्याची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही बँकांची यादी घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही RD करून चांगली कमाई करू शकता. किंवा भविष्यासाठी चांगली रक्कम गोळा करू शकता.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना ५ ते १० वर्षांच्या आरडीवर ७.२५ टक्के व्याज दर ऑफर करत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के दराने व्याज देत आहे. तुम्ही येथे RD करून मोठा निधी तयार करू शकता.

DCB बँक

DCB बँक 5 वर्षांच्या RD वर 7.6 टक्के व्याज दर ऑफर करत आहे. लक्षात घ्या हा दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आरडीवर उपलब्ध असेल.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

येथे गुंतवणूकदार 36 ते 60 महिन्यांच्या कालावधीसाठी RD वर 7.2 टक्के व्याज मिळवू शकतात. तर 63 ते 120 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या FD वर 6.5 टक्के व्याज मिळवू शकतात.

इंडसइंड बँक

इंडसइंड बँक ६१ महिने आणि त्याहून अधिक कालावधीच्या आवर्ती ठेवींवर ७ टक्के व्याज देत आहे.तर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे.

ड्यूश बँक

ड्यूश बँक आरडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे जे 60 महिन्यांत परिपक्व होईल.

HDFC बँक

HDFC बँक 5 वर्षांच्या RD वर 7 टक्के व्याज देत आहे जी 5 वर्षात परिपक्व होईल. बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक ७.५० टक्के व्याज देत आहे.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँक ५ वर्षांच्या आरडीवर ७ टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ५ कोटींहून अधिक रकमेच्या आरडीवर ०.७५ टक्के व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News