Rekha Jhunjhunwala Share Price : शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे बारीक लक्ष असते. मार्केटमधील अशाच एक दिग्गज गुंतवणूकदार म्हणजेच दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला.
गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे नेहमीच लक्ष ठेवतात आणि त्या पोर्टफोलिओनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान आज आपण रेखा झुंजून वाला यांच्या पोर्टफोलिओ मधील एका अशा स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत जो की येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवण्याची शक्यता आहे.

टॉप ब्रोकरेज कडून या संबंधित शेअर्ससाठी बाय रेटिंग देण्यात आली असून येत्या काळात हा शेअर्स 40% रिटर्न देण्याची शक्यता असल्याचा अंदाज सुद्धा समोर आला आहे. ब्रोकरेज हाऊस आनंद राठी यांनी 709 रुपयांच्या आसपास असणाऱ्या या शेअर्सवर विश्वास दाखवला आहे.
कोणता आहे तो स्टॉक ?
ब्रोकरेज हाऊस आनंद राठी यांच्याकडून ज्युबिलंट इनग्रेविया या शेअर्सवर विश्वास दाखवण्यात आला आहे. या शेअर्समधून गुंतवणूकदारांना येत्या काही महिन्यांमध्ये 38% रिटर्न मिळेल असा विश्वास ब्रोकरेज हाऊस कडून व्यक्त करण्यात आला आहे.
या शेअरसाठी ब्रोकरेज हाऊसने 975 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. म्हणजेच करंट मार्केट प्राइस पेक्षा हा स्टॉक 38 टक्क्यांपर्यंत वाढेल असा विश्वास ब्रोकरेज हाऊसला आहे.
महत्वाची बाब म्हणजे दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 47 लाख 35 हजार 500 शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांची या कंपनीत तीन टक्के एवढी हिस्सेदारी आहे.
खरे तर या कंपनीने गेल्या काही वर्षांच्या काळात वेगवेगळ्या व्यवसायांसाठी करोडोंचा खर्च केला आहे. स्पेशल्टी केमिकल्स, न्यूट्रिशन आणि CDMO व्यवसायासाठी कंपनीकडून जवळपास वीस अब्ज रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात या गुंतवणुकीतून कंपनीला अपेक्षित यश मिळाले नाही मात्र आता ही गुंतवणूक कंपनीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कंपनीच्या कारखान्याची क्षमता वाढल्याने आणि उत्पादनांची विक्री वाढल्याने येत्या काळात या कंपनीला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे.
ही कंपनी आता कमी नफा देणाऱ्या कमोडिटी व्यवसायाकडून जास्त नफा देणाऱ्या स्पेशल्टी केमिकल्स आणि न्यूट्रिशन व्यवसायाकडे वळत आहे आणि म्हणूनच ब्रोकरेज हाऊस या कंपनीवर विश्वास दाखवत आहे. दरम्यान शेअरची करंट मार्केट प्राइस हे गुंतवणुकीसाठी योग्य आहे असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे.
म्हणजेच या किमतीवर गुंतवणूकदार हा स्टॉक खरेदी करू शकतात. दरम्यान पुढील दोन-तीन वर्षात या शेअर्समधून गुंतवणूकदारांना चांगली कमाई होणार असा अंदाज आहे.