Reliance Communication Share:- रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचा (RCom) शेअर एकेकाळी 792 रुपये होता.परंतु आज तो अवघ्या 1.50 रुपयांवर घसरला आहे. विशेष म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला.
यामुळे तो 5% लोअर सर्किटमध्ये गेला आणि दिवसाच्या नीचांकी 1.56 रुपयांवर पोहोचला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष 6 फेब्रुवारीच्या एका महत्त्वाच्या निर्णयाकडे लागले आहे.
कंपनीची मोठी बैठक
रिलायन्स कम्युनिकेशन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार 6 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीच्या बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे लेखापरिक्षण न झालेल्या आर्थिक निकालांवर चर्चा केली जाणार आहे. या निकालांवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. कारण कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे.
शेअर बाजारात RCom ची स्थिती
गेल्या काही वर्षांत रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये 20% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. तर सहा महिन्यांत 17% आणि गेल्या एका महिन्यात 19% घसरण झाली आहे.
विशेष म्हणजे या शेअरच्या व्यवहारांवर काही दिवस बंदी होती. मात्र मागील पाच वर्षांमध्ये हा शेअर 120% वाढला होता.ज्यामुळे तो काही काळ मल्टीबॅगर ठरला. तरीही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा शेअर प्रचंड नुकसानदायक ठरला आहे.
2008 पासून 99% घसरण
रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सनी 11 जानेवारी 2008 रोजी 792 रुपयांचा उच्चांक गाठला होता. परंतु त्यानंतरच्या कालावधीत हा शेअर तब्बल 99% पेक्षा अधिक कोसळला आहे. सध्याच्या स्थितीत या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 2.59 रुपये आहे.तर 52 आठवड्यांतील नीचांकी किंमत 1.50 रुपये आहे.
गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा
6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कंपनीच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातात? याकडे संपूर्ण बाजाराचे लक्ष असेल. आर्थिक निकाल आणि कंपनीच्या पुढील धोरणांवरून हा शेअर भविष्यात कोणत्या दिशेने जाईल याचा अंदाज बांधला जाईल.
दिवाळखोरीच्या प्रक्रियेमुळे कंपनीसाठी पुढील काळ आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी योग्य धोरण आखणे गरजेचे आहे.