Reliance Industries Share Price:- शेअर बाजाराची आजची म्हणजे 17 जानेवारीची सुरुवात जर बघितली तर ती घसरणीने झाली व 400 पेक्षा अधिक अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 76,600 च्या पातळीवर व्यवहार करत होता व निफ्टी देखील 100 पेक्षा अधिक अंकांनी घसरल्याचे दिसून आले. परंतु असे असताना देखील मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीमध्ये असल्याचे दिसून आले.
आज या शेअरमध्ये 2.66 टक्क्यांची वाढ होऊन 1300.20 रुपयांवर पोहोचला. या सगळ्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरकरिता टॉप ब्रोकरेज फर्मने रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे व त्यासंबंधीची माहिती आपण बघणार आहोत.
नुवामा ब्रोकरेज फर्मने दिली रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी नुवामा ब्रोकरेज फर्मने खरेदीचा सल्ला दिला असून त्यांनी या शेअरकरिता बाय रेटिंग दिली असून १६७३ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2025 चे डिसेंबर तिमाहीसाठी सर्व विभागांमध्ये सकारात्मक कामगिरी केली व त्या जोरावर 43800 कोटी रुपयांचा EBITDA नोंदवला आहे.
IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने किती दिली आहे टार्गेट प्राईस?
इतकेच नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी आयआयएफएल सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने देखील खरेदीचा सल्ला दिला असून बाय कॉलसह 1729 रुपये टारगेट प्राईस दिली आहे.
एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने दिली ही टार्गेट प्राईस
एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने देखील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर करिता खरेदीचा सल्ला दिला असून या फर्मने या शेअरसाठी ‘ॲक्यूम्यूलेट’ रेटिंग दिली आहे. मात्र टार्गेट प्राईस १६३२ रुपयांवरून घटवून 1493 रुपये केली आहे.