रिलायन्स पॉवरचा शेअर मिळवून देणार भरपूर पैसा! येणाऱ्या काळात तेजीने देईल परतावा; जाणून घ्या तज्ञांचे मत

काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि घसरणीसह बाजार बंद देखील झाला. सेन्सेक्समध्ये 780 तर निफ्टीमध्ये 211 अंकांची घसरण पाहायला मिळाली. परंतु या परिस्थितीमध्ये काही कंपन्यांचे शेअर मात्र गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये राहिल्याचे दिसून आले.

Ratnakar Ashok Patil
Published:
reliance power share

Reliance Power Share:- काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आणि घसरणीसह बाजार बंद देखील झाला. सेन्सेक्समध्ये 780 तर निफ्टीमध्ये 211 अंकांची घसरण पाहायला मिळाली. परंतु या परिस्थितीमध्ये काही कंपन्यांचे शेअर मात्र गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये राहिल्याचे दिसून आले.

या फोकसमध्ये राहिलेले शेअर जर बघितले तर यामध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरचा देखील समावेश होता. कारण या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसून येत आहेत. काल शेअर बाजाराच्या घसरणीच्या कालावधीत देखील रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअरमध्ये 2.31 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले व या वाढीसह हा शेअर 42.15 वर पोहोचला होता.

गेल्या 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी जर बघितली तर ती 53.64 रुपये होती तर या शेअरची 52 आठवड्यांची निचांकी पातळी १९.४० रुपये होती.रिलायन्स पॉवर शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून साधारणपणे 30 टक्के घसरला आहे.

रिलायन्स पावर लिमिटेडने दिली स्टॉक एक्सचेंजला महत्वाची अपडेट
रिलायन्स एनयु सनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपची कंपनी असून ही कंपनी आंध्र प्रदेश राज्यातील कुरनुल जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे व त्यासंबंधीची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे.

रिलायन्स एनयु सनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उप कंपनी असून या कंपनीने बिल्ड ऑन ऑपरेट तत्वावर हा मेगा प्रोजेक्ट हाती घेतला आहे व आशिया खंडातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी ऊर्जा स्टोरेज प्रकल्प असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांनी दिले सकारात्मक संकेत
स्टॉक मार्केटचे तज्ञ ध्वनी पटेल यांनी या शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे व त्यांनी म्हटले आहे की, “मागील एक वर्षापासून या कंपनीचा शेअर तेजी मध्ये होता व या कालावधीत या शेअरमध्ये 41.21 टक्क्यांची वाढ झाली आहे”. परंतु अलीकडच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून 30 टक्क्यांनी हा शेअर घसरल्यानंतर चॅनल सपोर्ट लेव्हल वरून पुनरागमन केले आहे.

हा पावर स्टॉक काही काळ प्रमुख तांत्रिक निर्देशांक बोलींजर बँडच्या खाली घसरला होता. त्यानंतर मात्र या शेअरने पुन्हा तेजी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इतकेच नाही तर पुढे त्यांनी म्हटले की, रिलायन्स पॉवर शेअरमध्ये सध्या नव्याने खरेदीचा ट्रेंड दिसून येत आहे व हा ट्रेंड येणाऱ्या कालावधीत तेजीचे संकेत देत आहे. त्यामुळे रिलायन्स पॉवर शेअर येणाऱ्या काळात तेजीने परतावा देऊ शकतो व त्यानंतर 48 रुपयांची पहिली टार्गेट प्राईस गाठेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe