Reliance Power Share Price:- शेअर मार्केटमध्ये सध्या जे काही शेअर गुंतवणूकदारांच्या टार्गेटवर दिसून येत आहेत त्यामध्ये रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीचा शेअर देखील समाविष्ट आहे. रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीचा शेअर पुन्हा फोकसमध्ये असल्याचे दिसून आले.
जरी आज या कंपनीच्या शेअरमध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 40.28 रुपयांवर पोहोचला असेल तरी देखील रिलायन्स पावर लिमिटेड कंपनी बाबत जी काही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे त्यानुसार या कंपनीचे शेअर येणाऱ्या कालावधीमध्ये मजबूत स्थितीत राहतील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
आजच्या ट्रेडिंग सत्रात जरी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 29 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली व तो 40.28 रुपयांवर पोहोचला असला तरी देखील रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये जी काही माहिती दिली ती खूप महत्त्वाची आहे.
याबद्दल माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीने सोमवारी म्हणजेच 20 जानेवारी रोजी नीरज पारख यांची कंपनीचे नवे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे व त्यांची ही नियुक्ती 20 जानेवारी 2025 पासूनच लागू होणार असून कंपनीचे संचालक मंडळ जो कालावधी निश्चित करतील तितक्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.
नीरज पारख यांच्याबद्दल जर आपण बघितले तर 21 वर्षांपूर्वी म्हणजेच जून 2024 मध्ये ते रिलायन्स इन्फ्रा कंपनीमध्ये सेंट्रल टेक्निकल सर्विसेस टीममध्ये अतिरिक्त व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते व गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये अनेक आव्हानात्मक भूमिका आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत
व त्या पार देखील पाडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा फायदा रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला येत्या काळात होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या काय आहे रिलायन्स पावर लिमिटेड कंपनीच्या शेअरची स्थिती?
गेल्या एक वर्षात जर आपण या कंपनीच्या शेअरची स्थिती बघितली तर त्यामध्ये 8.15 टक्क्यांची घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच गेल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना या शेअरने 45% परतावा दिला आहे
व पाच वर्षाच्या कालावधीत बघितले तर या शेअरने गुंतवणूकदारांना 1900% परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यातील उच्चांकी पातळी 53.64 आणि नीचांकी पातळी ही 19.40 इतकी राहिलेली आहे.