Reliance Share:- 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात मुळातच घसरणीसह सुरू झाल्याचे दिसून येत आहे. जर आपण सध्याची बीएससी सेंन्सेक्सची स्थिती बघितली तर त्यामध्ये -0.11% ची घसरण झाली असून या घसरणीसह सेन्सेक्स 81088.68 वर पोहोचला आहे. तसेच निफ्टीमध्ये देखील -0.21% ची घसरण झाली असून या घसरणीसह निफ्टी 24717.30 वर पोहोचली आहे.
1 ऑगस्ट 2025 रोजीची प्रमुख निर्देशांकाची सध्याची स्थिती

यासोबतच सध्या असलेली बाजारातील प्रमुख निर्देशांकाची स्थिती बघितली तर यामध्ये निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये देखील -0.32% ची घसरण झालेली असून 66882.05 वर पोहोचली आहे तर निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकामध्ये देखील -0.33% ची घसरण झाली असून या घसरणीसह 57210.3 वर पोहोचला आहे. इतकेच नाही तर निफ्टी बँक या प्रमुख निर्देशांकामध्ये देखील -0.26% ची घसरण सध्या दिसून येत आहे व या घसरणीसह हा निर्देशांक 55815.65 अंकांवर पोहोचलेला आहे.
1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजीची रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची स्थिती काय?
आज शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजीची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरची स्थिती बघितली तर ती गुंतवणूकदारांना दिलासा देणारी आहे. सध्या हा शेअर्स 0.78% नी वधारून 1402.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. काल म्हणजेच 31 जुलै 2025 रोजी ची या शेअरची बंद किंमत बघितली तर त्या तुलनेत आज 0.71% वाढीसह ट्रेड करत आहे.त्यामध्ये सुधारणा दिसून येत आहे. सध्या हा शेअर्स 1403 रुपये ते 1384.30 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची रेंज काय?
1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची नीचांकी आणि उच्चांकी पातळी बघितली तर ती 1384.30 ते 1403 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. तसेच या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी बघितली तर ती साधारणपणे 1551.00 इतके राहिली तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1115.55 इतकी राहिली. सध्या जर आपण या कंपनीचे मार्केट कॅप बघितले तर ते 18,96,170.07 इतकी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा जर बघितला तर एका आठवड्यात -2.87%, तीन महिन्यात +1.37%, सहा महिने +12.87% आणि एक वर्षात -8.05% परतावा दिलेला आहे.