RITES Share Price: ‘या’ सरकारी कंपनीला मिळाले 24 कोटींचे विदेशी कंत्राट! शेअर्सने घेतली मोठी उसळी

Published on -

RITES Share Price:- आज शेअर बाजारात RITES लिमिटेड या सरकारी कंपनीने चांगलीच हवा निर्माण केली. कारणही तसंच होतं व ते म्हणजे गयाना देशातून मिळालेलं कोट्यवधीचं आंतरराष्ट्रीय कंत्राट आणि दुसऱ्या सरकारी कंपनीसोबतचा नवीन करार हे होय.या दोन्ही घडामोडींनी RITES चे शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत पुन्हा एकदा झळकले आहेत.

कंपनीला कोणते मिळाले कंत्राट?

RITES ला तब्बल २९ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास २४ कोटी रुपयांचं एक महत्त्वाचं कंत्राट मिळालं आहे. हे कंत्राट गयानामधील ईस्ट बँक-ईस्ट कोस्ट रस्ते प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी आहे. यात मुख्यत्वे रस्ते विस्ताराच्या कामावर देखरेख करायची असून, काही आधी सुरू असलेल्या कामांचंही पर्यवेक्षण कंपनी करणार आहे. या संपूर्ण कराराचा कालावधी ३० महिन्यांचा आहे, ज्यात १८ महिने प्रत्यक्ष कामाचं निरीक्षण असेल आणि उर्वरित १२ महिने वॉरंटी कालावधी असणार आहे. म्हणजेच, या काळात काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास त्यांची जबाबदारी RITES घेणार आहे.

RITES ने ही माहिती अधिकृतपणे शेअर बाजाराला दिली असून, कोणत्याही हितसंबंधांचा भाग नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. गुंतवणूकदारांना हे फार महत्त्वाचं वाटतं कारण अशा करारांमधील पारदर्शकता कंपनीच्या विश्वासार्हतेला बळकटी देते.

या सरकारी कंपनीसोबत केला करार

या आंतरराष्ट्रीय यशानंतर RITES ने देशांतर्गत आणखी एक पाऊल उचललं आहे. ८ जून रोजी कंपनीने हिंदुस्तान कॉपर या दुसऱ्या सरकारी कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कराराच्या माध्यमातून दोन्ही कंपन्या महत्त्वाची खनिजे आणि धातू यांचा शाश्वत आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. यामध्ये खनिजांचे अन्वेषण, उत्खनन, प्रक्रिया आणि उत्पादन यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रकल्पांनुसार निधी वेगवेगळ्या पद्धतीने उभारण्यात येईल, त्यामुळे प्रत्येक प्रकल्प स्वतंत्र आर्थिक नियोजनासह राबवला जाणार आहे.

या घडामोडींचा कंपनीच्या शेअर्सवर झालेला परिणाम

या दोन्ही सकारात्मक घडामोडींचा थेट परिणाम RITES च्या शेअरवर पाहायला मिळाला. आज कंपनीचा शेअर ३०६ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता, जो मागील सत्राच्या तुलनेत जवळपास १ टक्क्यांनी उंचावलेला आहे. मागील सत्रात शेअर ३०१.९५ रुपयांवर बंद झाला होता. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात या स्टॉकने तब्बल ३२% ची भरघोस झेप घेतली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी RITES सध्या नक्कीच फायदेशीर सौदा ठरत आहे.

अशाप्रकारे RITES ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाच वेळी मजबूत हालचाल केली आहे. अशा घडामोडी केवळ शेअरच्या किमती वाढवण्यासाठी नव्हे, तर कंपनीच्या दीर्घकालीन विश्वसनीयतेसाठी महत्त्वाच्या ठरतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहिल्यास, ही कंपनी सध्या बाजारात चांगली कामगिरी करत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe