Multibagger Stocks : जर तुम्ही सध्या मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे.
आम्ही सध्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्स बद्दल बोलत आहोत. या आठवड्यात या शेअने जबरदस्त परतावा दिला आहे. रेल्वेच्या या शेअरने या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
तर गेल्या एका महिन्यात रेल्वेचा हा शेअर 22 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्याच वेळी, IRFC च्या या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 411 टक्के चा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. काल विशेष ट्रेडिंग दरम्यान म्हणजेच शनिवार, 18 मे, IRFC चे शेअर्स BSE वर 2.61 टक्क्यांनी 173.20 रुपयांवर बंद झाले.
दरम्यान, IRFC चे मार्च तिमाहीचे निकाल सोमवार, 20 मे रोजी जाहीर होणार आहेत. कंपनीचे बोर्ड सदस्य या दिवशी 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांचा विचार करतील. या दिवशी, मंडळाचे सदस्य 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशाची शिफारस देखील करू शकतात.
शेअरची कामगिरी
जर आपण IRFC शेअर्सबद्दल बोललो तर त्याची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी 192.80 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 31.20 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीने शेअर्सची वरची किंमत 207.80 रुपये निश्चित केली आहे तर खालची किंमत 138.60 रुपये निश्चित केली आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,26,346.52 कोटी रुपये आहे.