RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Published on -

RPOWER Share Price:- 19 सप्टेंबर 2025 रोजी शेअर मार्केट ट्रेडिंगची सुरुवातच मोठ्या घसरणीने झालेली दिसून येत असून आज अगदी सुरुवातीपासून सर्वच निर्देशांक मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.सध्याची आकडेवारी बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये सध्या 438.23 अंकांची मोठी घसरण दिसून येत असून 82575.73 वर व्यवहार करत आहे.

तसेच एनएसई निफ्टी 50 या सेन्सेक्समध्ये सध्या 109.05 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह 25315.45 वर पोहोचला आहे. तसेच महत्त्वाचे असलेले निफ्टी बँक या निर्देशांकात देखील 289.45 अंकांची मोठी घसरण दिसून येत असून या घसरणीसह सध्या 55438.00 वर पोहोचला आहे.

त्यासोबतच निफ्टी आयटीमध्ये 266.50 अंकांची घसरण झाली असून सध्या 36483.75 वर व्यवहार करत आहे. या घसरणीत रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तब्बल 0.07 अंकांची वाढ झाली असून हा शेअर सध्या 47.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स पॉवरच्या शेअरची आजची कामगिरी

आज मार्केटची सुरुवात घसरणीने झाली असून आज रिलायन्स पॉवरच्या शेअरची किमत वाढल्याचे दिसून येत आहे. या शेअरची आजची सुरुवातीची किंमत बघितली तर ती 48 रुपये राहिली व सध्या हा शेअर 47.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच आतापर्यंतचा परफॉर्मन्स बघितला तर आजची कमाल किंमत 47.79 राहिली असून किमान किंमत 46.57 इतकी दिसून येत आहे. तसेच एक वर्षाच्या कालावधीमध्ये या शेअरची कमाल किंमत 76.49 रुपये तर किमान किंमत 31.27 रुपये इतकी राहिली आहे.

रिलायन्स पॉवरच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा

या शेअरने आतापर्यंत गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर एक वर्ष कालावधीच्या गुंतवणुकीवर +43.71%, सहा आणि तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर अनुक्रमे +36.15% आणि -29.07% व एक महिन्याच्या गुंतवणुकीवर +9.47% इतका परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe