Rupay Card : आरबीआयची मोठी घोषणा! परदेशात व्यवहार करणे होणार खूप सोयीस्कर, कसे ते जाणून घ्या

Published on -

Rupay Card : नुकताच आरबीआयकडून मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात या बँकेकडून एटीएम, पीओएस मशीन तसेच परदेशातील व्यापार्‍यांच्या वापरासाठी भारतीय बँकांकडून रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ज्यामुळे व्यापार्‍यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिनाट दास यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. इतकेच नाही तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे रुपे कार्डला जगभरात मान्यता मिळणार आहे.

याबाबत आरबीआयने असे म्हटले आहे की “भारतीय बँकांकडून जारी करण्यात आलेल्या RuPay डेबिट आणि क्रेडिट कार्डांना द्विपक्षीय व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कार्ड योजनांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली आहे. ज्या भारतीयांना परदेशात जायचे आहे त्यांना त्यांच्या सोयीनुसार पेमेंट पर्याय वाढवण्यासाठी ही परवानगी दिली आहे.

तुम्हाला परदेशी सहलींसाठी फॉरेक्स रुपे कार्ड वापरता येईल. जे एक प्रकारचे प्रीपेड कार्ड असून व्यापारी, परदेशात शिकत असणारे विद्यार्थी आणि विविध देशांमध्ये प्रवास करत असणाऱ्या लोकांसाठी हे कार्ड खूप फायदेशीर ठरेल.

RBI च्या वार्षिक अहवालानुसार, RBI कडून 2025 पूर्वी पेमेंट व्हिजन डॉक्युमेंट कार्डमध्ये प्रवेश करण्यासाठी जागतिक स्वरूप तयार करण्यात आले आहे. त्यासोबत भूतान, सिंगापूर, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती सोबत ब्रँडिंगशिवाय रुपे कार्ड स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

इतर आंतरराष्ट्रीय कार्ड योजना रुपे कार्डच्या मुद्द्यावर अनेक देशांमध्ये चौकशी सुरू आहे. तथापि, आता रिझर्व्ह बँक, NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (NIPL) सोबत, क्रॉस-बॉर्डर पेमेंट भागीदारी तयार करून जागतिक स्तरावर UPI आणि RuPay कार्डची पोहोच वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe