डॉलर वगळता इतर चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर : सीतारामन

Sushant Kulkarni
Published:

३ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीन टक्क्यांची घसरण ही चिंतेची बाब आहे,कारण त्यामुळे आयात महाग झाली आहे.मजबूत होत असलेल्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला आहे.पण देशाचा आर्थिक पाया भक्कम असून डॉलर वगळता अन्य सर्व चलनांच्या तुलनेत स्थिर आहे,असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाच्या विनिमय दरातील घसरणीवर चालू असलेली टीका फेटाळून लावली.

रुपयाचा घसरता विनिमय दर चिंतेचा विषय असला तरी रुपया कमजोर होत असल्याची टीका मी स्वीकारणार नाही.देशाची स्थूल आर्थिक मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत.जर मूलभूत तत्त्वे कमकुवत असती, तर सर्व चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर राहिला नसता,असे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रुपयांवर दबाव आहे, परंतु आशिया आणि इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ते सर्वात कमी अस्थिर चलन आहे.अलीकडे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह मध्यवर्ती बँकेने या वर्षी व्यापार तूट वाढण्याव्यतिरिक्त कमी व्याजदर कपातीचे संकेत दिल्यानंतर डॉलर निर्देशांकात वाढ झाली आहे.

त्याचा परिणाम म्हणून डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला.रिझर्व्ह बँक रुपयाच्या चढ-उतारांची कारणे दुरुस्त करण्यासाठी बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आम्ही सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत,असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

रुपयाची अस्थिरता आणि विनिमय दरातील घसरण यावर टीका करणाऱ्यांबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात घाई केली जात आहे.आज डॉलरची मजबुती आणि अमेरिकेत नवीन प्रशासन आल्याने रुपयातील चढ-उतार समजून घेतले पाहिजेत.

टीका होऊ शकते, पण त्याआधी थोडा अभ्यास करून प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.’रुपयामध्ये जी अस्थिरता आहे ती डॉलरच्या तुलनेत आहे.इतर कोणत्याही चलनापेक्षा रुपया खूपच स्थिर राहिला आहे.

हा लोकांसाठीचा अर्थसंकल्प

हा लोकांसाठीचा अर्थसंकल्प आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यमवर्गावरील कर कमी करण्याच्या कल्पनेवर ठाम होते,परंतु नोकरशहांना पटवून देण्यासाठी वेळ लागला.प्रामाणिक करदाते असूनही त्यांच्या आकांक्षा पूर्ण होत नसल्याबद्दल तक्रार करणाऱ्या मध्यमवर्गाचा आवाज आम्ही ऐकला,असे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

सीतारामन यांनी नवीन दर मध्यमवर्गाचे कर लक्षणीयरीत्या कमी करतील आणि त्यांच्या हातात अधिक पैसे जातील.घरगुती वापर, बचत आणि गुंतवणूक वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात भांडवली खर्चात ११.२१ लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सीतारामन यांनी समर्थन केले,चालू आर्थिक वर्षात तो १०.१८ लाख कोटी रुपयांनी कमी झाला होता.खर्चाचा दर्जाही पाहावा लागेल,असेही त्या म्हणाल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe