Saral Pension Policy:  भारीच ..  ‘या’ पॉलिसीमध्ये मिळत आहे दरमहा 12 हजार रुपये ; जाणून घ्या कसं 

Ahmednagarlive24 office
Published:

Saral Pension Policy: ग्राहकांसाठी सध्या LIC वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत आहे. ज्यामुळे देशातील लाखो लोकांचा मोठा फायदा देखील होत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून LIC मध्ये आर्थिक गुंतणवूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका भन्नाट पॉलिसीबद्दल माहिती देणार आहोत .तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्हाला या पॉलिसीमध्ये घरी बसून दरमहा 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट पॉलिसीबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही या लेखात तुम्हाला LIC च्या सरल पेन्शन पॉलिसीबद्दल माहिती देत आहोत. या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला वृद्धापकाळात दरमहा 12,000 रुपये पेन्शन म्हणून दिले जातील. जर एखाद्या व्यक्तीने या पॉलिसी अंतर्गत पैसे गुंतवले तर त्याला दरमहा 12 हजार रुपये मिळतील. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झाला असाल तर ही पॉलिसी फक्त तुमच्यासाठी आहे.  यामध्ये तुम्ही एकत्र गुंतवणूक करू शकता. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 42 व्या वर्षी तीस लाख रुपये गुंतवले तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन म्हणून मिळतील.

सरल पेन्शन पॉलिसीची काही खास वैशिष्ट्ये

सरल पेन्शन पॉलिसी अंतर्गत एकाच वेळी गुंतवणूक केली जाते. यामध्ये पॉलिसीधारकाला कर्जाची सुविधा मिळते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, सर्व पैसे नॉमिनीला दिले जातात. सेवानिवृत्तांना लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत 40 ते 80 वयोगटातील लोक पॉलिसी खरेदी करू शकतात. यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला आजीवन पेन्शन मिळते.

सरल पेन्शन पॉलिसी घेण्याचे मार्ग

1. सिंगल लाईफ पॉलिसी ती कोणत्याही एका व्यक्तीच्या नावावर राहील. पॉलिसीधारकाच्या हयातीत, त्याला हे निवृत्ती वेतन म्हणून मिळत राहील. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, उर्वरित प्रीमियम रक्कम नॉमिनीला परत केली जाईल.

2. जॉइंट लाइफ पॉलिसी या योजनेत पती-पत्नी दोघांनाही पेन्शनचा लाभ मिळतो. जोपर्यंत प्राथमिक पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील, त्याच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल.

हे पण वाचा :- UPI पेमेंटचे टेन्शन घेऊ नका ! येथे जाणून घ्या नवीन नियमाबद्दल सर्व काही

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe