Saving Account Interest Rate : सध्या एफडी प्रमाणेच बचत खात्यावरील व्याजदर वाढवण्याचा ट्रेंड सुरु आहे. मागील काही दिवसांपासून, अनेक बँकांनी आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे, अशातच आता आणखी एका बँकेची या यादीत भर पडली आहे, नुकतेच युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या बचत खात्यावरील व्याज वाढवले आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या बचत खात्यावर 7.50 टक्के व्याज देऊ केला आहे. पण यासाठी एक अट देखील आहे. हा व्याजदर मिवण्यासाठी तुम्हाला बँकेत किमान 20 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 5 कोटी रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही बचत खात्यात 5 लाख ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान पैसे ठेवले तर तुम्हाला 7.25 टक्के दराने व्याज मिळेल.
सध्या युनिटी बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. तर जे खातेदार बचत खात्यात 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम ठेवतात त्यांना बँकेकडून वार्षिक 7.75 टक्के व्याज दिले जात आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफडी दर
सध्या बँक FD वर 4.50 टक्के ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD ऑफर करत आहे. त्याच वेळी, बँक वृद्धांना 9.25 टक्के व्याज देत आहे. तसेच सर्वसामान्यांना 1001 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 9 टक्के व्याज दिले जात आहे.
जर आपण उर्वरित कालावधीबद्दल बोललो, तर 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के, 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के आणि 46 ते 60 दिवसांच्या एफडीवर 5.25 टक्के व्याज आहे. 61 ते 90 दिवसांच्या एफडीवर 5.50 टक्के, 91 ते 164 दिवसांच्या एफडीवर 5.75 टक्के आणि 165 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 5.75 टक्के व्याज दिले जात आहे.
तुम्ही 6 महिने ते 201 दिवसांसाठी FD केल्यास तुम्हाला 8.75 टक्के व्याज मिळेल. तर ५०१ दिवसांच्या एफडीवर ८.७५ टक्के व्याज मिळेल. तुम्हाला 202 दिवसांपासून 364 दिवसांपर्यंत FD वर 6.75 टक्के व्याज मिळू शकते. यानंतर 1 वर्षाच्या FD वर 7.35 टक्के व्याज मिळेल.
जर तुम्ही 1 वर्ष ते 3 वर्षांसाठी FD केली तर तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी त्यावर 7.35 टक्के ते 7.65 टक्के व्याज मिळू शकते. 3 ते 5 वर्षांच्या FD वर 7.65 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या FD वर 7 टक्के व्याज मिळेल.