Saving Schemes : तुम्हीही बचत योजनांमध्ये गुंतवणूक केलीय का? लवकरात लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर पैसे जातील वाया

Ahmednagarlive24 office
Published:
Saving Schemes

Saving Schemes : सध्याच्या काळात बचत करणे खूप गरजेचे आहे. कारण पैसे कधी कोठे आणि कधी कामी येतील हे सांगता येत नाही. अनेकांचा जास्त परतावा आणि कोणतिही जोखीम नसणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो.

इतर योजनांपेक्षा सरकारी योजनांमध्ये जास्त परतावा दिला जातो. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. जर तुम्हीही या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

अर्थ मंत्रालयाकडून बचत योजनांशी आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या बाबत सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) किंवा इतर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांनी त्यांची खाते आधारशी जोडावे. जर तुम्ही हे काम केले नाहीतर तुमचे बचत योजना खाते गोठवण्यात येईल.

त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही गुंतवणूक केली असेल त्या ठिकाणी जावे लागणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँकेच्या शाखेत, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधारशी निगडित माहिती अपडेट करा. गुंतवणूकदारांना त्यांचा आधार क्रमांक बँक किंवा पोस्ट ऑफिसला द्यावा लागणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनंतर आधार क्रमांक बंधनकारक झाला आहे. वित्त मंत्रालयाकडून PPF, NSC आणि इतर लहान बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य करण्यात आले आहे.

अर्थ मंत्रालयाकडून आपल्या अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, ज्या गुंतवणूकदारांची खाती आधारशी लिंक केली नाहीत, त्यांनी 1 एप्रिल 2023 पासून सहा महिन्यांच्या आत ती लिंक करून घ्यावी किंवा ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी. जर तुम्ही असे केले नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही अल्पबचत योजनेत गुंतवणूक केली असल्यास आणि तुम्ही अजूनही तुमचा आधार कार्ड क्रमांक संस्थेकडे जमा केला नसेल, तर तो आजच करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe