Savings Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे ज्यामध्ये लोक आपले पैसे ठेवतात. ज्यावर बँक व्याजदर देखील देते, पण यावर मिळणारे व्याजदर हे खूपच कमी असतात, बँक बचत खात्यावर 2-3 टक्के व्याज ऑफर करते. लक्षात घ्या प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेळे असतात. पण जर आपण एफडीबद्दल बोललो, तर त्यावर सुमारे 7-8 टक्के व्याज मिळते.
अनेक बँका बचत खात्यांवर २-३ टक्के व्याज देत आहेत, तर लघु वित्त बँका ७-७.५ टक्के व्याज देत आहेत. म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर एफडी व्याज सारखे मिळेल. आज आमही अशा 5 लहान फायनान्स बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या बचत खात्यावर 7-7.5 टक्के व्याज देत आहेत.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ३.५ टक्के ते ७.५ टक्के व्याज देत आहे. तथापि, बचत खात्यावर मिळणारे व्याज वेगवेगळ्या जमा केलेल्या रकमेसाठी बदलते. तुमच्या बचत खात्यात २५ कोटी रुपये जमा केल्यावर तुम्हाला बँकेकडून ७.५ टक्के व्याज मिळेल. हे नवीन दर 1 जून 2023 पासून लागू झाले आहेत.
जना स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक देखील बचत बँक खात्यांवर 3.5 टक्के ते 7.5 टक्के व्याज देत आहे. तथापि, बचत खात्यावर 7.5 टक्के व्याज मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या खात्यात 10 कोटी ते 50 कोटी रुपये जमा करावे लागतील.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून 6-7 टक्क्यांपर्यंतचे व्याज दिले जात आहे. बचत खात्यावर इतके जास्त व्याज मिळविण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करावी लागेल. तर तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा केल्यास तुम्हाला 6 टक्के व्याज मिळेल.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँका
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 3.5 टक्के व्याज देत आहे. तर ही बँक १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर ५.२५ टक्के व्याज देत आहे. 5 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल, तर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 7.5 टक्के व्याज मिळेल. हा नियम 12 जुलै 2023 पासून लागू झाला आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 3.5 टक्के ते 7 टक्के व्याज देत आहे. हे वेगवेगळ्या रकमेवर देखील उपलब्ध असेल. तुम्ही बचत खात्यात 5 लाख ते 2 कोटी रुपये जमा केल्यास तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल. हे नवीन दर 1 मार्च 2023 पासून लागू आहेत.